बई:नगर सह्याद्री
मोठा भाऊ छोटा भाऊवरून महाविकास आघाडीतील वाद थांबलेला असतानाच आता या वादाने महायुतीत डोकं वर काढलं आहे. महायुतीतील शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि शंभुराज देसाई यांनी आम्हीच महायुतीत मोठा भाऊ असल्याचं विधान केलं आहे. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. त्यामुळे आम्हीच मोठा भाऊ आहे, असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील दोन्ही नेत्यांनी ही विधाने केल्याने महायुतीत जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. शिंदे गटाकडून एक प्रकारे हा भाजपला इशारा असल्याचंही सांगितलं जात आहे.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. टक्केवारीवर राजकारण मांडलं जात नाही. ठाकरेंनी लढवलेल्या जागा 22 आहेत. शिवसेनेच्या लढवलेल्या जागा 15 आहेत. त्याच्याशी तुलना कशी करणार? त्या तुलनेत आमचा जो स्ट्राईक रेट आहे, तो 46 टक्क्यांवर आहे. म्हणून आमच्या जागा त्या तुलनेत जास्त आहे. महायुतीत आमचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याने आम्हीच मोठा भाऊ आहोत, असं संजय शिरसाट म्हणाले.
ते पालखीचे भोई
काँग्रेसची ताकद आणि निवडून आलेले खासदार या बेसवर त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलंय. ज्यांनी त्यांची पालखी वाहिली होती, त्यांच्या पालखीचे जे खांदेकरी होते. त्यांनी पालखी घेऊन पुढे जावी. 288 मतदारसंघ ते लढवतील. त्यांचा विजय होवो किंवा पराभव होवो, हे लोक पालखीचे भोईच आहेत, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.