spot_img
ब्रेकिंगउपसरपंच असावं तर असा! जिवाची बाजी लावत वाचले पाच मुलांचे प्राण, 'त्या'...

उपसरपंच असावं तर असा! जिवाची बाजी लावत वाचले पाच मुलांचे प्राण, ‘त्या’ गावात नेमकं घडलं काय? वाचा सविस्तर

spot_img

शिरूर । नगर सहयाद्री:-
शिरुर तालुक्यातील पाबळ येथे काही दिवसांपुर्वी दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच इनामगाव (ता. शिरुर) येथे शेततळ्यात पोहायला गेलेली पाच शाळकरी मुलं बुडत असताना येथील उपसरपंच सुरज मचाले यांनी प्रसंगवधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे ही पाच मुलं बुडताना वाचली आहेत. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या कार्यामुळे सुरज मचाले यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शनिवार (दि १५) रोजी इनामगाव येथील ओंकार किरण खरात, गौरव किरण खरात, शिवराज मनोहर कांगुने, पृथ्वीराज रविंद्र खरात, सक्षम नवनाथ खरात ही पाच शाळकरी मुले दुपारच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती.यातील तिघे जण पाण्यात पोहत असताना बुडू लागले. त्यांना वाचविण्यासाठी उर्वरीत दोघेजण शेततळ्यात उतरले. परंतु या पाचही जणांना पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडू लागले.

परंतु दैव बलवत्तर म्हणुन नेमकं याचवेळी इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले हे योगायोगाने बोअरवेलची मोटार बंद करण्यासाठी आले होते. त्यावेळी ही पाचही शाळकरी मुलं पाण्यात बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्या मुलांच्या दिशेने धाव घेतली. आणि शेततळ्यात बुडणाऱ्या पाचही शाळकरी मुलांना वाचवत जीवदान दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...