Gold Silver Price Today: जून महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यात 22 जून रोजी सोने आणि चांदी दणकावून आपटले होते. त्यानंतर सोने-चांदीच्या किंमतीत किंमतीत घसरण झाली आहे. काय आहेत आता भाव?
गेल्या आठवड्यात सोन्याने 21 जूनला 810 रुपयांची उसळी घेतली. तर 22 जून रोजी किंमती 870 रुपयांनी उतरल्या होत्या. या आठवड्यात 24 जून रोजी किंमतीत 150 रुपयांची घसरण झाली. तर दुसऱ्या दिवशी भाव स्थिर होता. बुधवारी सकाळच्या सत्रात किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात अखरेच्या सत्रात चांदीत 3000 रुपयांची वाढ झाली नि दुसर्या दिवशी 2000 रुपयांची घसरण झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला 24 जून रोजी चांदी 300 तर 25 जून रोजी 700 रुपये अशी एकूण 1000 रुपयांची घसरण झाली. बुधवारी सकाळच्या सत्रात चांदी 100 रुपयांनी उतरल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा 10 ग्रॅमचा भाव?
24 कॅरेट सोने 71,739 रुपये,
23 कॅरेट 71,452 रुपये,
22 कॅरेट सोने 65,713 रुपये झाले.
18 कॅरेट 53,804 रुपये,
14 कॅरेट सोने 41,967 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.