अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महापालिकेतील बडा मासा अँटीकरप्शनच्या गळाला लागली असल्याची चर्चा नगर शहरात सुरू होती. मात्र या कारवाई बाबत नगर, नाशिकच्या कार्यालयामध्ये चौकशी केली असता त्यांनी या कारवाईबाबत होकारही दिला नाही व नकारही दिला नाही. त्यामुळे नगर शहरांमध्ये या कारवाईबाबत उलट-सुलट चर्चां सुरू होती. मात्र या कारवाईबाबत कोणीही दुजोरा दिला नाही. परंतु, कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचे कार्यालय सील केले असल्याची माहिती आहे.
अहमदनगर महापालिकेतील एक मोठा बडा मासा अँटीकरप्शनच्या जाळ्यात अडकला असल्याची चर्चा गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून समाजमाध्यमात सुरू होती. त्याबाबत समाजमाध्यमात देखील तसे मेसेज व्हायरल झाले होते. या विषयावर महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. अँन्टी करप्शनच्या जाळ्यात २ ते ३ मासे अडकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दरम्यान हा गळ नाशिक किंवा मुंबईच्या टीमने टाकल्याचे बोलले जात होते. या गळाला दोन ते तीन मासे अडकल्याची चर्चा होती. मात्र या कारवाईबाबात कोणीही अधिकृत दुजोरा दिला नाही. मात्र सोशल मिडियात या जाळ्याचे मेसेज जोरदार व्हायरल होत होते.
*लाच मागणी अहवाल*
दिनांक- 27/06/2024
➡ *युनिट – *अँटी करप्शन ब्युरो ,जालना*
➡ *तक्रारदार – पुरुष, वय 41 वर्षे*
➡ *आलोसे-*
1. डॉ. पंकज जावळे
वय- 47 वर्षे, पद- आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग -1 ) मूळ रा.माजलगाव जि.बीड
सध्या राहणार – शासकीय निवासस्थान ,अहमदनगर.
2. श्रीधर देशपांडे
वय- 48 वर्षे, पद- लिपिक टंकलेखक अतिरिक्त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग – 3 )
रा.अहमदनगर
➡ *लाच मागणी पडताळणी :-*
1. दि. 19/06/2024
2. दि. 20/06/2024
➡ *लाच मागणी रक्कम*-
9,30,000/-रुपये तडजोडी अंति 8,00,000/-रुपये
➡ *थोडक्यात हकिकत -*
यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4K रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि. 18.03.2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला.
सदर परवानगी साठी आलोसे क्रमांक 1 हे आलोसे क्र.2 यांच्या मार्फत 9,30,000/-रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना डॉ. जावळे आयुक्त आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दिनांक 19.06.2024 रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांचे तक्रारी वरून आलोसे यांची लाच मागणी पडताळणी दिनांक 19.06.2024, 20.06.2024 रोजी केली असता
आलोसे क्र. 2 देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8,00,000/- रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली.लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे आलोसे क्र.2 यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध त्यांचेविरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
*▶️ *सापळा अधिकारी*-
*किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना
*
**▶️ मार्गदर्शक -मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो. छत्रपती संभाजीनगर
मा. मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजी नगर
▶️ *सहाय्यक सापळा अधिकारी*-
शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो ,जालना
➡️ *सापळा पथक*-
पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर.
अँटी करप्शन ब्युरो ,जालना.
**लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा.*
*श्री. किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो जालना
कार्यालय 02482-220252*
टोल फ्री क्रमांक.1064