Manoj Jarange Patil: एकीकडे महाराष्ट्र भरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे-पाटील आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मूळगाव (मातोरी) येथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. मातोरी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यामध्ये मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उगारले होते. जरांगे पाटील हे मराठा आरक्षण ओबीसीमधूनच पाहिजे असल्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर हाके ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगाव (मातोरी) येथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमकं घडलं काय?
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा काल बीडमध्ये आली होती. रात्री गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा नियोजित दौरा हा भगवानगड येथे होता. मात्र, त्यापूर्वीच सायंकाळी म्हणून जरांगे पाटील यांच्या मूळ गावी मातेरीमध्ये एका डीजेवर तसेच रस्त्यावरील काही गाड्यावर दगडफेक करण्यात आली. मातोरी गावात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर मातेरी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.