मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने पुढील 3-4 दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता माहितीनुसार हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्यटकांनी आणि नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय हवामान खात्याने काही भागांमध्ये यलो आणि ऑरेज अलर्ट जारी केला आहे.
मान्सूनने दिल्लीत प्रवेश केल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, रस्त्यांना पाणी साचले आहे. मान्सून आता राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, आणि जम्मू काश्मीरकडे सरकत आहे.