अहमदनगर। नगर सहयाद्री:-
तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तुमचे राजकीय करकिर्द संपवून टाकू अशी धमकी एका भाजपाच्या माजी आमदाराला देत १ कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी कल्पना सुधीर गायकवाड, महिला बांगर (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर यांच्या विरोधात हा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. भैय्या बॉक्सर याने माजी आमदारांच्या पीए कडून सुमारे २५ हजार रूपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी हे जानेवारी महिन्यात आष्टी येथील संपर्क कार्यालयामध्ये लोकांना भेटण्यासाठी आले होतो. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास माझे पीए सोबत होते. त्यावेळी कार्यालयात एक महिला आली. तिने मला तिचे नाव बांगर आहे, अशी माहिती दिली. तिने मला तुम्हाला भेटण्यासाठी कल्पना गायकवाड मॅडमने पाठविले आहे. मला तुमच्याशी खाजगी बोलायचे आहे, असे सांगितले. तेव्हा मी माझ्या संपर्क कार्यालयातील इतर लोकांना थोडे बाहेर थांबा, असे सांगितले.
तेव्हा बांगर या महिलेने मला सांगितले की, तुमची एक अश्लिल व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती लीप कल्पना गायकवाड मॅडमने मला दिलेली आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, कि कोणती व कशाची लीप आहे. ते मला दाखव. तेव्हा ती मला म्हणाली की, कल्पना गायकवाड मॅडमने मला सांगितल्या शिवाय ती अश्लिल लिप तुम्हाला दाखवायची नाही. सदरची लिप ही सोशल मिडीयावर प्रसारीत करायची नसेल तर कल्पना गायकवाड मॅडमसाठी तुम्ही माझ्याकडे १ कोटी रुपये द्या. नाही तर ती तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे, असे सांगितले. तुम्ही तुमचा निर्णय मला लवकर कळवा. असे म्हणुन ती माझ्या संपर्क कार्यालयातुन निघुन गेली. त्यानंतर काही दिवसांनी फोन आला. तुम्ही कोण बोलत आहे असे विचारले असता तेव्हा समोरुन सदर महिला म्हणाली की, बांगर बोलत आहे. तेव्हा मी सदर महिलेला तुमचे काय काम आहे, असे विचारले असता तीने फोन कट केला. अनेक वेळा फोन आले, तेव्ही मी तिचे फोन उचलले नाही.
दिनांक १८ फेबु्रवारी २०२४ रोजी मोबाईल फोनवर मेसेज आला व त्यानंतर लगेच मला फोन आला. फोनवर मी कल्पना गायकवाड बोलत आहे. मी तुमच्याकडे बांगर या महिलेला पाठविले होते. माझ्याकडे तुमचे काही अश्लील व्हिडीओ लिप आहे. सदरची लीप सोशल मिडियावर व्हायरल करेल. तुमच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करेल. तुमची बदनामी करुन तुमचे राजकीय करीअर उद्धवस्त करुन टाकीन, अशी धमकी दिली. तुमचे राजकीय करीअर उध्दवस्त होऊ नये, असे वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे किंवा मी पाठविलेल्या बांगर महिलेकडे १ कोटी रुपये दया अशी धमकी द्या, असे सांगितले. सदर महिलेने पुन्हा फोन केला. घरच्या पत्यावर व तुमच्या हितचिंतकाकडे सदर अश्लील व्हिडीओ लिप कॉपी करुन पाठविणार आहे. आणि उन्नु चॅनलला तुमचे नाव टाकुन डाऊनलोड करुन प्रसारीत करेल, अशी धमकी दिली. कल्पना गायकवाड, बांगर या महिलेच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता. सदर तक्रारी अर्जावर पोलिसांनी चौकशी केली. नंतर सदर बांगर व कल्पना गायकवाड या महिलांनी मला संपर्क करण्याचे बंद केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.
दरम्यान ११ मे २०२४ रोजी आष्टी येथे राजकीय कार्यक्रमांत होतो. त्यावेळी अहमदनगर येथील टाईम्स ऑफ अहमदनगर यावेब पोर्टलचा पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉसर याने माझ्या नावाने त्या महिलेला जिवे ठार मारण्याची व कुटुंबाला उचलुन नेण्याची धमकी दिली, अशा आशयाची बातमी प्रसारीत केली. सदरची बातमी मला समजल्यानंतर माझे सांगण्यावरून माझे पीए सहाय्यक जफर शेख यांनी सदर पत्रकाराशी संपर्क साधून खोटी बातमी लावु नका, असे सुनवले. सदर पत्रकाराने त्यांने प्रसारीत केलेली बातमी डिलीट केली. त्यानंतर दिनांक १४ मे २०२४ रोजी माझे पीए जफर शेख यांच्या फोनवर तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉसर यांनी कॉल केला. मला आमदार साहेबांशी बोलायचे आहे. तुम्ही नगर येथे आले नंतर मला कळवा. आपण समक्ष भेटल्यानंतर सर्व सांगतो, असे त्यांने सांगितले. त्यानंतर नगर मार्गे मुंबई येथे जात असतांना मी नगरच्या आस पास असतांना माझे पीए सहाय्यक जफर शेख यांच्या मोबाईल फोनवर तथाकथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉसर यांने फोन करून कुठे आहेत, असे विचारले.
तेव्हा आमचे पीए यांनी आम्ही नगरच्या जवळ आहोत. मुंबईकडे चाललो आहोत, असे सांगितले. तो म्हणाला मला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही स्टेट बँक चौकामध्ये रॉयल जुसबार तेथे भेटु. आम्ही रॉयल जुसबार येथे आले नंतर भैय्या बॉसर हा मला भेटला व म्हणाला की, आपण सदरचे प्रकरण आर्थिक देवान घेवुन करुन मिटून टाकु. कल्पना गायकवाड हिच्याकडे आपली एक अश्लिल लीप आहे. ती महिला ही माझ्या संपर्कात असुन ती नगर येथेच राहते. मी तुमचे सेटलमेंन्ट करुन देतो. तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुमची काय अपेक्षा आहे. तेव्हा पत्रकार भैय्या बॉसर मला म्हणाला की, कल्पना गायकवाड या महिलेची अपेक्षा १ कोटी रुपये आहे. त्यामध्ये मी काहीतरी तडजोड करुण प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही मला काहीतरी द्या असे तो म्हणाल्याने आम्ही त्याचेशी चर्चा करून तेथुन निघुन गेलो. त्यानंतर पीए जफर शेख यांनी फिर्यादीच्या उपरोक्ष २५ हजार रुपये दिले.
कशाला द्यायचे ते सवयीचे आहेत ते वारंवार आपल्याला पैशासाठी त्रास देत रहातील, तुम्ही असे करायचे नव्हते. असे मी त्यांना म्हणालो. भैय्या बॉसर याने वांरवार फोन केला. मात्र आम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही. अहमदनगर येथील टाईम्स ऑफ अहमदनगर या वेब पोर्टलवर कल्पना गायकवाड या महिलेला हाताशी धरुन माझ्या विरुद्ध खोटी बातमी लावुन माझी जनमानसामध्ये बदनामी केली आहे. तसेच कल्पना गायकवाड व तथाकथित पत्रकार भैय्या बॉसर यांना हाताशी धरुन माझी अश्लिल व्हिडीओ लिप आहे. ती सोशल मेडीयावर प्रसारीत करतो, अशी धमकी दिली. तसेच बातमी प्रसारीत करीत नाही यासाठी माझ्याकडून १ कोटी रुपयाची मागणी केली. माझे पीए जफर शेख यांचे कडुन २५ हजार रुपये स्विकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.