अहमदनगर । नगर सहयाद्री:-
रत्नदीप मेडिकल फौंडेशन रत्नापूर तालुका जामखेड या संस्थेच्या बिएचएमएस व बिएससी नर्सिग विद्यार्थी वगळता इतर पाच कॉलेज च्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर चार महिन्यांपासून झाले नाही. संस्थेच्या परिसरात हरीण पाळले व एक हरीण मृत पावले ही अतिशय गंभीर बाब आहे या सर्व प्रकरणाची शासकीय स्तरावरून उच्चस्तरीय चौकशीची मागणी आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित करून मांडली. त्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशीची मागणी मान्य केली आहे.
आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदेत रत्नदीप मेडिकल फौंडेशन रत्नापूर ता. जामखेड या संस्थेच्या एकाच इमारतीत बिएचएमएस, बिएएमएस,बिएससी नर्सिग कॉलेज, बि फॉर्मसी, डि फॉर्मसी, जिएएनएम, एएनएम अशा प्रकारे सात कॉलेज चालवले जातात. या संस्थेत महाविद्यालयीन काही विद्यर्थीनीचे शाररीक, माणसिक,अर्थिक,लैंगिक पिळवणूक झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ५ मार्च पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली. व कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. २०२४ पासून या संस्थेच्या सर्व शैक्षणिक परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेतला व विद्यार्थांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली आहे असे वैद्यकीय विभागाने म्हटले आहे.
रत्नदीप मेडिकल फौंडेशन संस्थेच्या बाबतीत आंदोलन करून चार महीने झाले परंतु बिएचएमएस व बिएससी नर्सिंग वगळता इतर विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले नाही. तसेच संस्थेने विद्यार्थ्यांकडून घेतलेले पैसे परत दिले नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी २७ एप्रिल पासून पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे तात्काळ स्थलांतर करावे अशी मागणी आ. राम शिंदे यांनी करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.