spot_img
अहमदनगरशरद पवार यांच्या पाठोपाठ अजितदादा नगर दौऱ्यावर; 'या' मतदारसंघांचा घेणार आढावा

शरद पवार यांच्या पाठोपाठ अजितदादा नगर दौऱ्यावर; ‘या’ मतदारसंघांचा घेणार आढावा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला वाढदिवस नगरमध्ये साजरा करणार असून सोमवार दि.२२ जुलै रोजी ते नगर दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यानिमित्त पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अमलबजावणीला प्राधान्य देत चारही तालुक्यांमध्ये विविध उपक्रारमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्टवादी कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुरज चव्हाण पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा दौरा नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. या दौऱ्यात जाहीर सभांचे नियोजन न करता उपमुख्यमंत्री पवार महिलांशी व जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना शेवटच्या स्तरातील महिलांपर्यंत जाण्यासाठी उपाययोजना राबविणार आहेत. नगर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून येथील जनतेने अजित दादांवर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त उपक्रम राबवण्यावर पक्ष भर देत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. महायुती येणाऱ्या विधानसभा निवडणूक एकत्रित पणे लढवणार असून जस्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न आहेत.

प्रास्ताविकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत या चारही विधानसभा मतदार संघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नगर दक्षिण भागात प्रभावीपणे राबवण्यावर पक्षाचे पदाधिकारी भर देत आहेत.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष कपिल पवार, .नगर शहर राष्ट्रवादी कॉंग्रसचे युवक शहराध्यक्ष केतन क्षिरसागर, शिरूर तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार सोमवारी पारनेर दौर्‍यावर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी, तसेच तालुयातील महिलांशी संवाद साधत या योजनेसंबंधी त्यांच्या असणार्‍या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (दि.२२) पारनेर येथे येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली.

पारनेर येथे गायकवाड यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी ही माहिती दिली. या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, महिला अध्यक्ष सुषमा रावडे, युवा अध्यक्ष भास्कर उचाळे आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांचा हा दौरा पक्षाच्या वतीने आयोजित केला आहे. पुण्याहून ते पारनेरला येत आहेत. या दौर्‍याच्या वेळी ते तालुयातील माता-भगिनींशी पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते अहमदनगरला जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुयातील शेवटच्या महिलेपर्यंत गेला पाहिजे. हाच या मेळाव्याचा हेतू आहे, असेही गायकवाड म्हणाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, शिवसेनेचे (शिंदे गट) विकास रोहकले, तसेच महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सुषमा रावडे यांनी सांगितले.
विधानसभेच्या दृष्टीने चाचपणी..

उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेर दौर्‍यावर येत असल्याने पारनेर नगर विधानसभा मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाऊ शकतात. अनेक नवीन प्रवेश होण्याची सुद्धा शयता नाकारता येत नाही. दौर्‍याच्या निमित्ताने पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात अजित पवार विधानसभेच्या दृष्टीने चाचपणी करू शकतात. त्यामुळे त्यांच्या या दौर्‍याकडे पारनेर तालुयातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण ही राज्य सरकारने आणलेली योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त व आर्थिक आधार देणारी आहे. या योजनेचा लाभ तालुयातील प्रत्येक महिलेने घ्यावा. या योजनेपासून तालुयातील एकही महिला राहाणार नाही, अशी आम्ही काळजी घेत आहोत. त्यासाठी पारनेर येथे होणार्‍या मेळाव्यास तालुयातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे.
-सुषमा रावडे (अध्यक्षा : राष्ट्रवादी महिला काँग्रेस, पारनेर)

अजितदादा सोमवारी श्रीगोंद्यात; नागवडे कारखान्यावर मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे / जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांची माहिती
महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला भगिनींकरिता जाहीर केली असून सदर योजना प्रभावीपणे राबविण्यामध्ये श्रीगोंदा तालुका व विशेषतः नागवडे यांच्या टीमने चांगले काम झाले असून शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे करिता प्रयत्न केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. २२ रोजी दुपारी १ वाजता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व जिल्हाध्यक्षा सौ. अनुराधा नागवडे यांनी दिली.

नागवडे यांनी म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते असल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक समाज उपयोगी योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय ठरली असून तिची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे झाली असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २२ जुलै रोजी १ एक वाजता नागवडे कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आमदार संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी असून या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजितदादांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींची उपस्थिती महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याच दिवशी अजितदादांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन व सत्कारही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...