पारनेर । नगर सहयाद्री:-
बनावट एटीएम कार्डचा वापर करुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीना पारनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. मल्हारी दत्तात्रय शेंडगे ( वय-३४ वर्षे रा. वनगळी ता. इंदापुर जि. पुणे ) अमोल भगवान शेंडे ( वय-३५ वर्षे रा काटी ता इंदापुर जि पुणे ) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून ३२,७३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. १७ जून २०२४ रोजी पारनेर शहरातील सेजल कॉम्प्लेक्समध्ये एस.बी.आय. बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढत असताना एका अनोळखी इसमाने फसवणूक केली. त्या व्यक्तीने पैसे काढता येत नाही का? असे म्हणून हातचलाखीने फिर्यादीचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या खात्यातून ३४,०२० रुपये काढले. या फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद पारनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
सदर गुन्ह्यांचा तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज व डम डाटाचे आधारे आरोपीचा शोथ घेत असताना गुप्त बातमीदाराद्वारे पारनेर पोलिसांना सदरचा गुन्ह्यातील आरोपी नगर तालुक्यातील खंडाळा गावचे शिवारात रस्त्यालगत असलेल्या हॉटेल सांयतारा जवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानतंर पारनेर पोलिसांनी
सापळा रचुन दोन आरोपीना गजाआड केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. आरोपीविरोधात शेवगांव, सोलापुर, कोल्हापुर, बेळगांव येथे गंभीर गुन्हे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक खैरे साहेब, उपविभागिय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे, पो.हे.कॉ श्यामसुंदर गुजर, पो.कॉ. जगदिश बुधवंत, पो. कॉ सागर धुमाळ, पो. कॉ. सारंग वाघ, पो. कॉ. देविदास अकोलकर, मपोहे ज्योती काळे, पो.कॉ. राहुल गुंडु, पो. कॉ नितिन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.