श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील भिमा व घोडनदीच्या संगमावर असणार्या सांगवी दुमाला परिसरामध्ये धाडसी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. परिसरातील नलगे वस्तीवर मध्यरात्री बंगल्याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी पंचवीस तोळे सोने व साडेपाच लाख रुपये रोख असा सुमारे २३ लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. याप्रकरणी लक्ष्मण नलगे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथील भाजपचे जेष्ठ नेते लक्ष्मणराव नलगे यांच्या शेजारीच त्यांचे भाऊबंद साहेबराव एकनाथ नलगे कटूंबासह वास्तव्यास आहे. ( दि.२४ ) जुलै रोजी त्यांच्या बंगल्यातील किचनचा दरवाजा मध्यरात्री तोडून चोरट्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला. तेव्हा कुंटुबातील मोठा मुलगा लक्ष्मण व पत्नी दोघे बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपले होते. चोरट्यांनी त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश करुण कपाटातील पंचवीस तोळे सोने व दोन दिवसापूर्वी शेतातील कांदा विकून आलेले साडेपाच लाख रुपये असा एकूण तेवीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
सकाळी घरातील महिला लवकर उठल्यानंतर सदरचा प्रकार ऊघडकिड्स आला. त्यानंतर जेष्ठ नेते लक्ष्मणराव नलगे यांनी घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना दिली. त्यानंतर श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक समीर अभंग हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. चोरीचे गांभीर्य ओळखून कर्जतचे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, तसेच नगरहून श्वानपथक,तसेच ठसे तज्ञ यांनी येवून घटनास्थळी पहाणी करित माहिती घेतली. परंतु रात्रभर पाऊस जास्त असल्यामुळे श्वानाला काहीच मार्ग सापडला नाही. चोरट्यांचे ठसे मात्र मिळून आले आहे.
धाडसी चोरी आव्हान देणारी
लक्ष्मण साहेबराव नलगे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपासाची चक्रे श्रीगोंदा पोलिसांनी हलविली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे.
चोरीत चोरटे हुशार निघाले?
साहेबराव नलगे यांच्या बंगल्याचा दरवाजा बुधवारी मध्यरात्री तोडून घरातील पंचवीस तोळे सोने व साडेपाच लाख रुपये रोख चोरुण नेताना त्यामध्ये काही खोटे सोने पण होते ते खोटे सोने चोरट्यांनी बंगल्याच्या शेजारी शेतात टाकून दिले. पण खरे पंचवीस तोळे मात्र घेऊन गेले. यामध्ये चोरी करणारे चोरटे हुशारच निघाले.