spot_img
अहमदनगरएकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

spot_img

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची माहिती घ्या!

सारिपाट | शिवाजी शिर्के

राहुरीच्या ढोकणेंच्या नादी लागून बेअब्रूच पदरी पडणार | … तर दोन महिन्यांनंतर शिंदे ठाण्यात देखील अस्तित्वहीन होणार!

कांदा उत्पादकांच्या पाठीशी सरकार असल्याचे नाटक वठविण्यास निघालेल्या एकनाथ शिंदे यांच्या कांदा बँकेची स्क्रिप्ट राहुरीतील ठग भारत ढोकणे यानेच लिहिल्याचे समोर येत आहे. राहुरीसह जिल्ह्याला गंडा घालून एकनाथरावांना गंडविण्यास सज्ज झालेल्या ढोकणे याने कांदा बँकेची अभिनव आयडिया शिंदे यांच्या डोस्क्यात घातली. शिंदे यांनी त्याची उपयुक्तता समजून न घेताच ‘लै भारी’ आयडिया असल्याचे समजून दाढीवरून हात फिरविला. राज्यातील कांदा उत्पादकांसाठी आपण काहीतरी वेगळे करत असल्याचे दाखविताना एकनाथ शिंदे यांनी ढोकणे नावाचा मोठा ढेकूण राज्यातील शेतकर्‍यांना लुटण्यास पोसला की काय अशी काय अशी शंका येऊ लागली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी बीएआरसी आणि महाराष्ट्र पणन मंडळाने सुरू केलेले लासलगाव इरॅडिएशन युनीट आजही कांद्यासाठी वापरले जात नाही. खरे तर कांदा बँक हा विषय )ृषी मंत्रालयाचा असताना व त्या मंत्रालयाकडून तो मुख्यमंत्र्यांसमोर येणे अपेक्षित होते. मात्र, हा प्रस्ताव मांडला उद्योग मंत्रालयाने! एकनाथराव, सल्लागार तपासा! लासलगावचा कांदा प्रयोग फेल गेला असताना भारत ढोकणेच्या नादी लागून राज्यातील शेतकर्‍यांना उल्लू बनविण्याचा हा उद्योग तात्काळ थांबवा! हे थांबले नाही तर दोन महिन्यांवर निवडणुका आल्याच आहेत! तसेही तुमच्या सरकार विरोधात जनमत तयार झाले आहेच! जनतेच्या संयमाची वाट पाहू नका! कडेलोट होऊ द्यायचा नसेल तर चुकीचे निर्णय तरी घेऊ नका!

कांदा उत्पादकांना दिलासा देण्याच्या नावाखाली राज्यात चार ठिकाणी कांदा बँक स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर त्या विरोधात शेतकर्‍यांमधून मोठा संताप व्यक्त झाला. विशेषत: नगर जिल्ह्यातील राहुरी भागात हिंदुस्थान अ‍ॅग्रो हे नाव समोर येताच या कंपनीशी निगडीत भारत ढोकणे याने अभिनव बँकेसह या कंपनीच्या नावाखाली अनेकांना गंडविल्याच्या सुरस कथा समोर आल्या. सारिपाट च्या माध्यमातून आम्ही त्यावर प्रकाश टाकताच संपूर्ण राज्यभरातून आमच्या बाणेदार भूमिकेचे स्वागत झाले. कृषी क्षेत्राशी निगडीत अनेकांनी आमच्या भूमिकेचे स्वागत कले आणि एकनाथ शिंदे यांच्या आंधळ्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली.

मुळातच विकिरण स्त्रोत हाताळणे अत्यंत धोकादायक आहे आणि स्वयंचलित ऊर्जा प्राधिकरणाच्या कठोर नियंत्रणाखाली ते केले जाऊ शकते. त्यामुळे, मोबाईल इरॅडिएशन युनिट्स शय नाहीत. या अडचणींमुळे कांद्यासाठी हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले आहे. बीएआरसी आणि महाराष्ट्र पणन मंडळाने २५ वर्षांपूर्वी सुरू केलेले लासलगाव इरॅडिएशन युनिट कांदा विकिरणासाठी वापरले जात नाही. कांद्याची प्रक्रिया केलेली उत्पादने, बेदाणे, तांदूळ, कडधान्ये आणि मसाल्यांच्या किरणोत्सर्गासाठी सध्या लासलगाव येथे याचा वापर केला जात आहे.

राहुरीजवळील मुळा कारखाना परिसरात असणार्‍या भारत ढोकणे याचा हिंदुस्थान अ‍ॅग्रो हा खासगी कारखाना! लासलगावनंतर विकिरणाचा दुसरा प्रयोग येथे सुरू करण्याचे ठरले. मोठा गाजावाजा झाला. मात्र, या कारखान्याचे शेड आणि किरकोळ मशिनरी वगळता येथे काहीच झाले नाही. एकाही कांद्यावर येथे प्रक्रिया झाली नाही. मात्र, तरीही ढोकणे याने सरकारकडून मोठ्या प्रमाणात सबसीडी मिळविली. हे युनीट प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. आजही या माळरानावर फक्त कुसळ नावाचे गवत उगवलेले दिसते.

कांद्यामधील विकिरण केवळ त्या कांद्याला अंकुर (कोंब) फुटण्याचे नुकसान थांबविते. कोंब फुटण्याचे नुकसान केवळ सामान्य साठवणुकीमध्ये पाच टक्के इतके आहे. याशिवाय ही प्रक्रिया कांद्याचे वजन कमी करणे आणि बुरशीजन्य किंवा बॅटेरियामुळे होणारे नुकसान थांबवीत नाही हे देखील समजून घेण्याची गरज आहे.
कांद्याची साठवणूक करताना जर तुम्ही ० डिग्री सेल्सिअस आणि ६५ टक्के आर्द्रतेच्याखाली कांदे साठवत असाल, तर कोल्ड स्टोरेजनंतरचे नुकसान खूप मोठे आहे. एका आठवड्यात तोटा ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला विकिरण तंत्राची आवश्यकता असते. हे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कारण शेतकर्‍यांच्या जवळ इरॅडिएशन युनिट उपलब्ध नाही. उत्पादन केंद्रापासून १०० किलोमीटर अंतरावर विशिष्ट ठिकाणी इरॅडिएशन करवून घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्चाची भर पडणारी असते.

लासलगावच्या विकिरणचा २५ वर्षांपूर्वीचा प्रयोग सपशेल अयशस्वी ठरला.आता या केंद्रात या विकिरणांचा वापर अन्य कारणांसाठी केला जात आहे. हे सारे समोर असताना व त्याची माहिती न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोकणेंच्या प्रेमात पडत राज्यातील शेतकर्‍यांना चुना लावण्याचे काम परवा केले इतकीच काय ती त्यांची उपलब्धी! अर्थात, हा चुना साधासुधा नक्कीच नसणार! त्याची किंमतही तितकीच जोरकसपणे ढोकणे याने मोजली असण्याची शक्यता आता जाहीरपणे चर्चेत आहे. राहुरीचे (नगर) उदाहरण देताना मुख्यमंत्री महोदयांनी त्याला जोड दिली ती सोलापूर, संभाजीनगर आणि नाशिक येथे या तंत्रज्ञानासह कांदा महाबँस सुरू करण्याची! लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर महायुतीच्या शिंदे सरकारने चुका दुरुस्त करण्याची गरज आहे.

मात्र, त्यांच्याकडून चुकांचा पाऊसच सुरू आहे. संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांशी सल्लामसलत न करता हे सरकार निर्णय घेत आहे की काय अशी शंका आता सार्‍यांनाच येऊ लागली आहे. खरे तर कृषी संशोधन संस्थांमध्ये कोणते आणि कशाचे संशोधन चालू आहे याचा अभ्यास राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथरावांनी करण्याची गरज आहे. संशोधन केंद्र आणि कृषी शास्त्रज्ञांनी संशोधनाअंती सिद्ध केल्यानुसार कांदे २५ अंश सेल्सिअस आणि ६५ टक्के आर्द्रतेवर साठविले जाऊ शकतात. यासाठी कांद्यावर विकिरण करण्याची आवश्यक नसते. कारण त्यावेळी कांद्याच्या साठवणुकीतील विकिरण घटक संपुष्टात आलेला असतो.

पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरजवळील पेठ येथे कला बायोटेक यांनी साधारणपणे तीन वर्षांपूर्वी पाच हजार टन क्षमतेचे कांदा शीतगृह तयार केले आणि ते चांगले काम करीत आहे. सरकारला कांद्याचा आणि कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा खरेच कळवळा असेल, शेतकर्‍यांप्रती पूतना मावशीचे प्रेम नसेल तर एकनाथराव तुम्ही एकदा मंचरजवळील या बायोटेकला भेट द्या! तुमच्या पुढ्यात बसलेले दिलीप वळसे पाटील यांना या केंद्राची माहिती आहेच! त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्या अनुषंगाने निर्णय घ्या! भारत ढोकणेंच्या नादी लागला असाल तर वेळ अद्याप गेलेली नाही. ढोकणेंचा नाद अन् त्यांची सलगी तुम्हाला दोन महिन्यांनंतर राज्याच्याच नव्हे तर ठाणेकरांच्या सेवेत देखील ठेवणार नाही याची जाण आणि त्याचे भान असू द्या इतकेच!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...