अहमदनगर। नगर सहयाद्री:-
शेअर मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणारे दोन आरोपी शेवगाव पोलीसांनी गजाआड केले आहेत. आरोपींची नावे अशोक बाबुराव कदम आणि लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके (दोन्ही रा. गदेवाडी, ता. शेवगाव) अशी आहेत.
नवनाथ हरिशचंद्र इसरवाडे (रा. गदेवाडी) यांनी ए.के. ट्रेडिंग कंपनी नावाच्या शेअर मार्केटमध्ये ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार, २५ जुलै रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग सुनिल पाटील यांनी तपास पथक तयार केले.
सुनिल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी अशोक बाबुराव कदम आणि लक्ष्मण उर्फ बबलु दत्तात्रय मडके हे गदेवाडी आणि बोधेगावमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथक तेथे रवाना झाले.तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता, पोलीसांना चाहुल लागताच आरोपी पळून जात असताना त्यांना गदेवाडी आणि बोधेगाव येथून ताब्यात घेतले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. दिगंबर भदाणे, स.पो.नि. अनिल बागुल, पो.स.ई. अमोल पवार, पो.हे.कॉ. परशुराम नाकाडे, पो.कॉ. शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे, संतोष वाघ, संपत खेडकर, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर यांनी केली. पुढील तपास पो.स.ई. अमोल पवार हे करत आहेत.