spot_img
अहमदनगरजिल्ह्यातील सहा जागांवर अजितदादांचा डोळा!; खा. लंके, डॉ. विखे कोणाला देणार बळ...

जिल्ह्यातील सहा जागांवर अजितदादांचा डोळा!; खा. लंके, डॉ. विखे कोणाला देणार बळ…

spot_img

विधानसभेसाठी इच्छुकांची मोर्चबांधणी सुरू
अहमदनगर : नगर सह्याद्री
आगामी विधानसभा निवडणूकीचे वारे जोरदारवाहू लागले आहे. नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीतील घटनपक्षांच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पारनेर, नगर, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांच्या दौर्‍यांच्या माध्यमातून मतांची साखरपेरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणूकीत खासदार नीलेश लंके व सुजय विखे कोणाच्या पारड्यात वजन टाकणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच अनेक पक्ष या मेळाव्यांच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर ठेपली आहे. सर्वच पक्ष या निवडणूकीच्या अनुषांगाने कामाला लागले. मागील आठवड्यात जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी विधानसभा निवडणूकी संदर्भात आढावा घेतला. तसेच नगर मध्ये थांबत दक्षिण मतदार संघातील विधानसभा निहाय माहिती देखील घेतली. तसेच मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यापाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहिन योजनेच्या माध्यमातून चार विधानसभा मतदार संघात महिला मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहे.

पारनेर, कर्जत-जामखेड, नगर शहर व श्रीगोंदा या विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे मतदारसंघ सोपे असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणूकीत नीलेश लंके शरद पवार गटांत प्रवेश करत विजयांचा गुलाल घेतला. त्यामुळे पारनेर मध्ये अजित पवार नवीन पर्याय शोधत आहेत यात प्रशांत गायकवाड, विजय सदाशिव औटी, सुजित झावरे, काशिनाथ दाते, अशोक सावंत, यांच्या सोबत पवार यांचे मैत्रीचे संबंध आहे. ते विधानसभेला कोणाला पुढे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच नगर शहरामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. तसेच आ.जगताप यांची संपूर्ण मतदारसंघावर मजबूत अशी पकड आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये अजितदादा गटातून अनेक जण स्पर्धेत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, दत्तात्रय पानसरे इच्छुकांचे आपल्या मतदार संघात चांगले संघटन असल्यामुळे अजित पवार यांना भाजपचे बबनराव पाचपुते यांच्यासमोर कोणाला संधी द्यायची. यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आपलाच पुतण्या रोहित पवारच्या विरोधात स्थानिक उमेदवार म्हणून राजेंद्र गुंड यांना पुढे करतील का? की रोहित पवारांना रोखण्यासाठी आपल्याच घरातील एखादा उमेदवार उभा करतील हे येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये समजेल किंवा अजित पवार राम शिंदे यांच्या मदतीने भाजपच्याच उमेदवाराला मदत करत महायुतीचा धर्म पाळतील हे येणार्‍या काळातच दिसून येईल. माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकप्रकारे विधानसभा निवडणूकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. तसेच यामेळाव्याच्या माध्यमातून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांना बळ दिले.

खासदार नीलेश लंकें च्या भूमिकेकडे लक्ष?
विधानसभेच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दक्षिण मध्ये लक्ष घातल्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे नेते अजित पवार यांच्या सोबतच दोन हात करावे लागणार आहे. मला खासदारकीला सर्व पक्षीयांनी मदत केली असे जाहीर लंके यांनी सांगितले आहे. आजपर्यंत अजित पवार व निलेश लंके यांचे राजकीय प्रेम लपून राहिलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात निलेश लंके आता काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील तिकीट वाटपात खा. लंके यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

विखेंची यंत्रणा सक्रिय..
महायुतीमध्ये अजित दादांच्या राष्ट्रवादीने पारनेर, नगर, श्रीगोंदा, कर्जत या मतदार संघात दावा ठोकला आहे. नगर जिल्ह्यात विखेंची यंत्रणा काय भूमिका घेणार हे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत समजेल. भाजपाचे नेते माजी खासदार सुजय विखे आपल्या कार्यकर्त्यांसाठी कोणते मतदारसंघ मागणार हे पण येणारा काळत ठरवणार आहे. विधानसभा निवडणूकीत नगर दक्षिण मध्ये महायुतीतील तिकीट वाटपात सुजय विखे पाटील कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हे महत्वाचे ठरणार आहे.

उत्तरेतील दोन जागा लढविणार..
राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर अकोले येथील आमदार डॉ. किरण लहामटे व कोपरगावचे आमदार अशितोष काळे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. अजित पवार गटांकडे उत्तरेतील अकोले व कोपरगाव हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. कोपरगाव येथे आ.काळे यांचे मजबूत संघटन आहे. तसेच किरण लहामटे यांनी देखील अकोले मतदारसंघ मजबूत बांधला आहे. त्यामुळे दक्षिणेतील चार व उत्तरेतील दोन अशा ६ जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...