spot_img
अहमदनगरविधानसभा निवडणूक लढवणारच! श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून 'या' बड्या नेत्याने केली मोठी...

विधानसभा निवडणूक लढवणारच! श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून ‘या’ बड्या नेत्याने केली मोठी घोषणा

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
राज्यपातळीवरील अनेक नेते मी विधानसभा निवडणूक लढवावी, या दृष्टीने सकारात्मक आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमधून मला उस्फूर्त पाठिंबा आहे. श्रीगोंदा तालुयातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत मी अनेक निवडूणकांत मदत केली असल्याने त्याची परतफेड या नेत्यांनी करावी. मी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्व ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.

आगामी दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक चुरस श्रीर्गोंदा विधानसभा मतदार संघात दिसून येते. विधानसभा निवडणूकीत अण्णासाहेब शेलार यांनी उडी घेतल्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. श्रीगोंदा तालुयाचे आराध्य दैवत संत शेख महंमद महाराज यांची पुजा करुन अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले, मी माझ्या राजकीय जीवनातली शेवटची निवडणूक लढविणार आहे. विजयी झालो तरी पुढील विधानसभा निवडणूकीत मी दुसर्‍याला संधी देणार आहे. पराजित झालो तरी ही पून्हा कोणतीच निवडणूक आयुष्यात लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले. साजन पाचपुते, बाळासाहेब नाहाटा व दतात्रय पानसरे माझे खास मित्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मित्रांनी मला मदत केली तर त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असेही शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले.

आपण तडजोडीतील उमेदवार असू असा अपप्रचार भविष्यात होऊ शकतो. मात्र श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातील आम जनतेला आठवण करून देवू इच्छितो की मी आ. पाचपुते यांचा कार्यकर्ता असताना २००९ साली बंड करून अपक्ष उमेदवारी केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यावेळी मला अनेक प्रलोभणे दाखविली. मात्र मी निवडणुकीवर ठाम होतो. ती निवडणूक लढवून दाखविली. यावेळी मीनिवडणूक लढविणार आहे या मतावर ठाम असून या निवडणुकीची सर्व तयारी भी पूर्ण केली असल्याचा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

…अपक्ष उमेदवारी करणार
राज्यातील नेते माझ्या उमेदवारीविषयी सकारात्मक राष्ट्रीय तसेच राज्यपातळी वरील नेते माझ्या अनेक महिन्यापासून संपर्कात आहेत. श्रीर्गादा विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी करावी म्हणून आग्रही आहेत. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करायची. याबाबत मी चाचपणी करत असून त्याचा तिढा ही लवकर सुटेल. पक्षपातळीवर उमेदवारीचा तिढा सुटला नाहीतर मात्र मी अपक्ष विधानसभेची उमेदवारी करण्यावर ठाम आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...