spot_img
अहमदनगरशहरातील 'तो' रस्ता मॉडेल म्हणून ओळखला जाणार! आ. जगताप यांनी केली विकासकामांची...

शहरातील ‘तो’ रस्ता मॉडेल म्हणून ओळखला जाणार! आ. जगताप यांनी केली विकासकामांची पाहणी

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
गणेश चौक, सिव्हिल हडकोसह तारकपूर परिसरातील समस्याची पाहणी स्थानिक नागरिकांसमवेत आ.संग्राम जगताप यांनी केली. यावेळी नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी आ.जगताप यांनी सर्व नागरिकांचे म्हणणं ऐकत तातडीने समस्या सोडविण्याबाबत मनपा अधिकार्‍यांना निर्देश दिले. दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागत असल्याचे प्र्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

यावेळी माजी नगरसेविका कलावती शेळके, माजी नगरसेवक अजिंय बोरकर, बाळासाहेब पवार, सुरेश हीरानंदानी, काका शेळके, गजेंद्र भांडवलकर, शहर अभियंता मनोज पारखे,सचिन जगताप, दीपक जाधव, संदीप साबळे, गणेश गांधी, अनिल दळवी, समीर थोरात, जग्गू वाकुडे, राहुल जाधव, आदीसह अधिकारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहर विकासाची कामे सर्वच भागात सुरू असून सिविल हडको परिसरामध्ये रस्ते,लाईट,ड्रेनेज, कचरा, पाणी या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आज मनपा प्रशासनाबरोबर पाहणी आ.संग्राम जगताप यांनी केली. लवकरच या भागातील मंजूर रस्त्याची कामे सुरू होणार आहे. यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये गणेश चौक रस्त्याचे काम देखील मार्गी लागणार आहे. नियोजनबद्ध व कायमस्वरूपीची विकास कामे मार्गी लागावी. यासाठी नागरिकांशी चर्चा करून टप्प्याटप्प्याने कामे मार्गी लावली जात असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना माजी नगरसेविका शेळके म्हणाल्या, सिव्हिल हडको परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. ती कामे नियोजनबद्ध व्हावी ही आमची अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक ४ व ५ मधील डीपी रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी प्रभागाच्या विकासासाठी मोठ्या निधी उपलब्ध करून दिला आहे. मंजूर असलेली कामे आता सुरू होणार, असून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधण्याचे काम आमदार संग्राम जगताप करत आहे. पुढील अनेक वर्षांचा विचार करून ही विकास कामे मार्गी लावली जातील असे माजी नगरसेवक अजिंय बोरकर यांनी सांगितले.

शहरात मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल
तारकपूर रस्त्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरांमध्ये मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला असून, शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विकासाचे काम प्रगतीपथावर सुरू आहेत.
– आमदार संग्राम जगताप

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाउन्सरची दहशत मोडून काढणार ‘राऊळबुवा’!

दाखवायचं कोणाला आणि झाकायचं कोणाचं ? एक कुटुंब महिन्याला कर्मचार्‍यांचे पगार तर दुसरे कुटुंब...

Accident News: बस-आयशरच्या भीषण अपघातानं शहर हादरलं; एकाचवेळी सहा ठार, कुठे घडली घटना?

Accident News: वडीगोद्री मार्गावरील शहापूर जवळील वळणावर बस आणि संत्रा वाहतूक करणार्‍या आयशरचा भीषण...

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...