नगर सह्याद्री टीम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने पुन्हा एकदा मन जिंकलं आहे. मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने देशासाठी आणखी एक पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकले आहे. या पदकासोबतच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
भारताला दुसरे ऑलिंम्पिक पदक
2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. या दोघांनी कोरियन जोडीला हरवून कांस्यपदक जिंकले. यापूर्वी याच स्पर्धेच्या महिला एकेरीत मनू भाकरने कांस्यपदक पटकावले होते.
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या लढतीत आठ फेऱ्या जिंकल्या. त्यांनी कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव केला. कोरियन जोडीला फक्त पाच फेऱ्या जिंकता आल्या. यासह पदकासह एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय ठरली आहे.
मनूने इतिहास रचला
मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दुसरे पदक जिंकून इतिहास रचला. यावेळी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत मनूसोबत सरबज्योत सिंगचाही त्याच्या संघात समावेश होता. स्वातंत्र्यानंतर, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. याआधी मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलच्या एकाच स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.