spot_img
अहमदनगर'महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरणार'

‘महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरणार’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
महसूल व पशुसंवर्धन विभागातर्फे राबविला जाणारा पंधरवडा हा शासनाची प्रतिमा उंचविणारा ठरणार असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी केले, ते महसूल व पशुसंवर्धन विभागाच्या पंधरवड्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी बोलत होते. महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा मध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी शिबिर आयोजित करून जास्तीत जास्त लाभ द्यावा असे त्यांनी सांगितले. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडके बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित सर्व योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल पंधरवडा-२०२४ पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ शुभारंभ कार्यक्रम परिषद सभागृह, मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महसूल पंधरवाडा व पशुसंवर्धन पंधरवाडा दोन्हीसाठी शुभेच्छा देताना आनंद होतो आहे, हे नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील यंत्रणेचे प्रमुख असून सर्व विभागांसह शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहून महसूल पंधरवड्यामध्ये चांगले काम करावे.ते पुढे म्हणाले, कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत जनकल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे.पंधरवाडा निमित्त सर्व विभाग एकत्र येऊन काम करत असले, तरी शासन नेहमीच नागरिकांसाठी 24x 7 काम करत आहे. आपण या निमित्ताने विविध योजना लोकांपर्यंत नेऊन शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. पशुसंवर्धन पंधरवाडा मध्ये राज्यातील दूध भेसळीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर अतिशय कठोर काम केले जावे. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल यासाठी मोका(MPDA)सारखी कारवाई करावी. महसूल विभागाने सर्व यंत्रणच्या सहकार्याने दाखले व विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन काम करावे असे आवाहन या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल. पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे असे उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार म्हणाले. या प्रसंगी बोलताना मा. श्री. मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागाचा नागरिकांशी जन्म दाखल्यापासून,मृत्यू दाखल्या पर्यंत संबंध येतो. यामुळे महसूल विभागाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख व्हावा आणि महसूल विभागातील विविध शासकीय योजना व सेवा सुविधा यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी, लोकांमध्ये विभागाबद्धल विश्वास दृढ व्हावा यासाठी महसूल विभागाच्या वतीने महसूल दिन आणि सप्ताह साजरा केला जात होता. पण नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद पाहता यावेळी विस्तार करून सप्ताहऐवजी पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम, शिबिरे राबवून महसूल संबधित कामे केली जातील. यात शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी दिले जाणारे दाखले, जमिनीच्या संदर्भातील रखडलेली प्रकरणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना. युवांशी संवाद, सैनिकांची महसूल संबधित विविध कामे केली जातील.

देशातील अर्थव्यवस्थेत ४.११ टक्के पशुपालन व्यवसायाचा वाटा आहे.यामुळे राज्यातील पशुपालन व्यवसाय वाढीस लागावा, आणि शेतकऱ्यांना पशुपालन हा जोडधंदा न राहता प्रमुख उत्पनाचे साधन बनावे यासाठी प्रथमच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात पंचसूत्री कार्यक्रम राबवून पशुपालक यांच्यात जनजागृती करणे आणि पशुधनाची काळजी घेतली जाणार आहे. यात उच्च उत्पादक क्षमता असलेल्या वंशावळाची पैदास करणे, जनावरांचे लसीकरण, वैद्यकिय तपासणी, दूध योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण, पशुधनास सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन करणे, आणि २१ व्या पशुगणना अभियानाची जनजागृती केली जाणार आहे सदरचा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार, आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेतला जाणार आहे. तसेच महसूल विभागाच्या वतीने नागरिकांना विविध दाखले तात्काळ मिळावे यासाठी महाविद्यालयीन स्थरावर सेतू कार्यालये उभारण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...