spot_img
ब्रेकिंगराहुरी मतदारसंघाबाबत विखेंची मोठी घोषणा; त्यांनी माझ्यासाठी...

राहुरी मतदारसंघाबाबत विखेंची मोठी घोषणा; त्यांनी माझ्यासाठी…

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
गत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये माझ्या विजयासाठी भाजपा नेते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच आताच्या लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांच्यामुळेच नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हेच उमेदवार असतील. त्यांच्या विजयासाठी मी राहुरीमध्ये तळ ठोकणार असल्याची प्रतिक्रीया भाजपा नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.

भाजप नेते माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राहुरी व संगमनेर विधानसभा निवडणूकीबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकारणात धुरळा उडविला आहे. राहुरी व संगमनेरमधील राजकारण तापले असून मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे. नगर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूकीबाबत जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील अनेक नेते, पदाधिकारी मतदारसंघाचा आढावा घेत आहे. अवघ्या काही महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेेपल्या आहेत. त्यातच डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत वक्तव्य केले. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केली आहे.

दरम्यान २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना राहुरी विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. या राहुरी मतदारसंघातून डॉ. सुजय विखे पाटील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरतील असा अंदाज बांधला जात होता. तसेच त्यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यावरुन या चर्चाना अधिक बळ मिळाले. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे राहुरी मतदारसंघात कर्डिले हेेच लढणार असल्याचे माजी खासदार विखे पाटील यांनी सांगितले.

विखेंचा मोर्चा संगमनेरकडे
भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर किंवा राहुरीमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य गुरुवारी केले. विखे पाटलांच्या वक्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. संगमनेरमध्ये अनेक लोकांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे तेथील पदाधिकारी, नागरिकांकडून संगमनेरमध्ये विखे पाटील यांनी उमेदवारी करावी अशी मागणी आहे. तसेच मंत्री विखे पाटील यांनी मंत्रीपदाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये भरीव कामे केली आहे. नागरिकांना न्याय देण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील हे संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...