१८ लाखांचा मुद्देमाल जप्त | नऊ जुगारी पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
फुलसौंदर मळा परिसरातील जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकांने कारवाई करत सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच ९ जुगार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेे. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही माहिती दिली आहे.
कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील फुलसौंदर मळा परिसरातील लिंबाच्या झाडाखाली बुरुडगाव रोड येथे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दराडे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे रविवारी(दि.४) रात्री उशीरा पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ९ जुगार्यांना रंगेहात पकडले. या जुगार्यांकडून सुमारे १८ लाख ४२ हजारांचा ६५० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या संदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी आहेत जुगार्यांची नावे
भुषण बाबासाहेब बोरुडे (रा.बोरुडे मळा), प्रशांत गिरीष कसबे (रा.सारसनगर), अनिल कारभारी साबळे (रा.बुरुडगाव), राजेंद्र पांडुरंग शिंदे (रा.केडगाव देवी रोड एकता कॉलनी), किरण पांडुरंग सिदोरे (रा.बोरुडे मळा), विशाल शांतीलाल गांधी (रा.कायनेटीक चौक), भाऊसाहेब रामभाऊ भोसले (रा.बुरुडगाव), शेख सलमान बशिर (रा.विनायकनगर), राधाकिसन पांडुरंग फुंदे (रा.नारायणडोह) अशी पकडलेल्या जुगार्यांची नावे आहेत.