अहमदनगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही. शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे. त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे. मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे, असे मत माजी सभापती कुमार वाकळे यांनी बोल्हेगाव येथे बोलतांना व्यक्त केले.
बोल्हेगाव येथे महापालिकेचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रात बोलत होते. याप्रसंगी आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, माजी नगरसेवक राजेश कातोरे, विपुल शेटिया, डॉ.कविता माने, रमेश वाकळे, साहेबराव सप्रे, रावसाहेब वाटमोडे, दत्तात्रेय वाकळे, अरुण ससे, किसन कोलते, दिलीप वाकळे, हरिदास आरडे, भालचंद्र भाकरे, ज्ञानदेव कापडे, डॉ,अपूर्वा वाळके आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ.जगताप म्हणाले, आता नगर शहरामध्ये आ.संग्राम जगताप यांच्या विकासाची लाट आली आहे. प्रत्येक कॉलनी,वार्डात विकासाचे काम सुरू असून माझ्या वार्डात १०० पेक्षा जास्त रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शहरांमधील प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. नागरिकांचा विकास नागरिकांच्या च हातामध्ये असतो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार दिला असून चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचे, असेही ते म्हणाले.
नगर शहरामध्ये शासनाच्या माध्यमातून विविध भागात १८ दवाखाने तयार होत असून नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. बोल्हेगाव येथे आयुष्यमान आरोग्य केंद्र सुरू झाले आहे आपले आरोग्य सदृढ निरोगी राहावे यासाठी नागरिकांनी व्यायाम व चांगला आहार घ्यावा तरी नागरिकांनी आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे आव्हान आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.