Vinesh Phogat: महिला कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवायचं विनेशचं स्वप्न भंग झालं आहे. या स्पर्धेत विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. भारताने या निर्णयाचा विरोध केला आहे. विनेशचं वजन ५० किलोपेक्षा जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित केले आहे. या निर्णयाचा सर्व भारतीयांना धक्का बसला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘तुम्ही चॅम्पियनचे चॅम्पियन आहोत. तुम्ही भारताचा अभिमान आहात. तुम्ही प्रत्येक भारतीयांसाठी आदर्श आहात. फार दु:खद प्रकार आहे. मी शब्दांतून भावना व्यक्त करू शकलो असतो. मला विश्वास आहे की, तुम्ही मोठ्या दिमाखात पुन्हा पदार्पण कराल. आम्ही तुमच्यासोबत आहोत’. असं ट्विट करत म्हंटल आहे.
पंतप्रधान मोदींची अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे.