spot_img
अहमदनगरअहमदनगर मधील 'या' खुनाला झारखंडची किनार? प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून..

अहमदनगर मधील ‘या’ खुनाला झारखंडची किनार? प्रेमात अडथळा ठरतोय म्हणून..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील झोळे गावात घडलेल्या वृद्धाच्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भूषण कांताराम बाळे या तरुणाने साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे येथील साहेबराव उनवणे यांचा मृतदेह ५ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आला. त्यांच्या डोक्यावर जखमा असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली, ज्यात झारखंडमधील एका व्यक्तीने खंडणीसाठी खून केल्याचे नमूद होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, आणि पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी तीन पथके तयार करून खून प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक, तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तीचा तपास केल्यानंतर पोलिसांनी भूषण कांताराम बाळे याला अटक केली. पोलिसांनी केलेल्या शास्त्रशुद्ध तपासात आरोपीच्या मोबाईल व सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुन्ह्याची कबुली मिळवण्यात आली. भूषण बाळे याने इंस्टाग्रामवरील ओळखीमुळे हा खून केल्याची कबुली दिली आहे. भूषण कांताराम बाळे याच्यावर यापूर्वी देखील खून आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वृद्धाच्या खून प्रकरणात त्याला कोणाचे सहकार्य मिळाले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...