spot_img
ब्रेकिंगविधानसभा निवडणुकीचा सर्व्हे आला; अब की बार, कोणाचे सरकार! पहा...

विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे आला; अब की बार, कोणाचे सरकार! पहा…

spot_img

तीन विभागांत महायुती वरचढ ठरणार
मुंबई | नगर सह्याद्री

लोकसभा निवडणुकीत राज्यात ३१ जागा जिंकणार्‍या महाविकास आघाडीने आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करुन राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. महाविकास आघाडीने राज्यात सर्वेक्षण करुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार महाविकास आघाडीला विधानसभेला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागा जिंकणं गरजेेचे आहे.

विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना महाविकास आघाडीने राज्याची विभागणी सात भागांमध्ये केली आहे. नागपूर, अमरावती भागात काँग्रेसची कामगिरी चांगली होईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातही आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. तिथे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी चांगली कामगिरी करेल. सर्वच प्रमुख पक्ष विविध भागांमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास शरद पवार गटातील माजी कॅबिनेट मंत्र्याने व्यक्त केला.

चार विभागांमध्ये महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शयता असताना मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात महायुती पुढे राहण्याचा अंदाज आहे. या भागात भाजप, शिंदेसेना आण अजित पवार गटाची चांगली ताकद आहे. लोकसभेला कोकण पट्ट्यात आमची कामगिरी चांगली झाली नाही. आता विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचे आव्हान आहे. मुंबईतही भाजप, शिंदेसेनेचे मोठं आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेला काँग्रेसला काही जागा मिळाल्या. पण पक्ष अजूनही तिथे कमजोर आहे. कच्चे दुवे ओळखून त्यावर काम करण्यासाठी आता हाती फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेत्याने सद्यस्थिती सांगितली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...