spot_img
अहमदनगरटाकळी ढोकेश्वर येथे सौर प्रकल्प होण्यास ग्रामस्थांचा विरोध

टाकळी ढोकेश्वर येथे सौर प्रकल्प होण्यास ग्रामस्थांचा विरोध

spot_img

ग्रामस्थांना विश्वासात न घेता सौर प्रकल्पाचा ठराव बंद खोलीत / प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी अनेक वृक्षांची तोड; वन विभागाचे सुद्धा दुर्लक्ष

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री –
टाकळी ढोकेश्वर येथील गायरानावर होत असलेला खाजगी सौर प्रकल्प होण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतकडे गायरान असलेली तेवढीच जागाच उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन तसेच गावातील जनावरे चरण्यासाठी राखीव जागा तेवढीच आहे. सौर प्रकल्प होण्यास टाकळी ढोकेश्वर गावचे उपसरपंच रामभाऊ तराळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडूंगे, ग्रामपंचायत सदस्य शुभम गोरडे युवा नेते बबलू झावरे अंकुश पायमोडे माजी सैनिक संजय खिलारी यांनी विरोध केला आहे त्या संदर्भातील पत्र व्यवहार जिल्हाधिकारी यांच्या सोबत करण्यात आला आहे पत्रामध्ये असे म्हटले आहे की
मौजे टाकळीढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा – अहमदनगर येथील गट नंबर १४३९, १४४०, १४४१. या क्षेत्रात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेचे काम चालू आहे. सदर ठिकाणी या प्रकल्पाच्या मंजूरी आगोदर सदर ग्रामपंचायतीच्या गावचा कचरा व्यवस्थापन डेपोचे काम चालू आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचा ठराव हा ग्रामसभेत न घेता बंद खोलीत झालेला आहे.

सदरची जागा ही जर सौर प्रकल्पासाठी दिली गेली तर गावच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उभा राहील तसाही तो आजही आहे. गावाच्या कडेला कचरा पडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. साथीचे आजाराचे प्रमाण ग्रामस्थांमध्ये आढळू लागले आहेत तरी सदर प्रकल्प थांबवण्यात न आल्यास ग्रामस्त नाईलाजस्तव उपोषणाचा इशारा देत आहेत ..

आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आपणास विनंती आहे की सदर प्रकल्पास स्थगीती देण्यात यावी व समस्त ग्रामस्थ टाकळीढोकेश्वर ग्रामस्थानचे आरोग्य सुरक्षित ठेवावे ही नम विनंती.. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे प्रकल्प होण्यासाठी विरोध दर्शविण्यात आला असून ग्रामपंचायतची जागा विना मोबदला खाजगी प्रकल्पाला कशी देण्यात आली हा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे.

सौर प्रकल्पाचा ठराव बंद खोलीत..
टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायततीने सौर प्रकल्पासाठी गायरानची जागा देण्या संदर्भातील ठराव हा बंद खोलीत केला व या ठरावाच्या संदर्भात त्यांनी ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवले असा थेट आरोपच ग्रामपंचायतवर रामभाऊ तराळ, दत्तात्रय निवडुंगे, शुभम गोरडे, अंकुश पायमोडे, बबलू झावरे, संजय खिलारी यांनी केला आहे.

वनविभागांचे दुर्लक्ष..
टाकळी ढोकेश्वर गायरानावर सौर प्रकल्प होत असून हा प्रकल्प होणाऱ्या जागेमध्ये शेकडो मोठे मोठे झाडे असून ते झाडे सुद्धा तोडण्यात आले आहे या संदर्भात वन विभागाची कोणतीही परवानगी घेतली गेली नाही वनविभागाने ही याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वनविभागाला सुद्धा हाताला धरून ग्रामस्थांना विरोध करत बंद खोलीत ग्रामपंचायतचा ठराव घेऊन सौर प्रकल्प होण्यास मनमानी नेमका कोणाची हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...