spot_img
अहमदनगरअहमदनगर मध्ये चाललंय काय? मध्यरात्री तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द केले आणि..;...

अहमदनगर मध्ये चाललंय काय? मध्यरात्री तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द केले आणि..; ‘तसली’ घटना बघून पोलीस देखील चक्रावले..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी एकरुखे शिवारात एका घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती-पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द केले. नंतर त्यांनी घरातील सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून नेला.

राहाता पोलिसांत बजरंग हरी गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ११ ऑगस्टच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमचा कडी कोयंडा तोडला. त्यांनी एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे गंठन, एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी आणि पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख २९ हजार रुपयांचा माल वापरण्याचे कपडे घेऊन पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस घटनास्थळी पोहचले. श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे वाहनात बसून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...