spot_img
अहमदनगरगोरक्षकावर हल्ला! गुन्हा दाखल, अहमदनगर मधील घटना

गोरक्षकावर हल्ला! गुन्हा दाखल, अहमदनगर मधील घटना

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गाडी पोलीस स्टेशनला चालवत आणल्याच्या रागातून दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात घडला. त्यानंतर रात्री उशिरा शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

अशोकनगर येथील चंद्रकांत निर्मळ आणि त्यांचा मित्र राहुल मापारी हे दोघे गुरुवारी रात्री अशोकनगरहून श्रीरामपूरकडे येत असताना त्यांना बोरावके कॉलेजकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ जमावाने एक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची झेनॉन गाडी आडवलेली दिसली तेव्हा सदर गाडीमध्ये गाया होत्या. त्यानंतर पोलिसांनी तेथे येऊन गाडी कोणाला चालवता येते का? असे विचारले असता चंद्रकांत निर्मळ यांनी होकार दिला.

त्यांनी ही गाडी चालवत पोलीस स्टेशनला आणली. त्यानंतर बुंदी कुरेशी, शाहरुख कुरेशी, तौफिक कुरेशी, मोहसीन कुरेशी, अदनान कुरेशी, सदाम कुरेशी, इरफान शेख, शाहरुख कुरेशी यांनी गाडी चालवत आणलेल्या चंद्रकांत निर्मळ यांना तु गाडी का चालवत आणली. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत सर्वांनी चंद्रकांत निर्मळ व राहुल मापारी यांना रिंगण करून मारहाण केली.

मारहाण करत असताना मोहसीन कुरेशी याने निर्मळ यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा शाहीद कुरेशी याने कमरेच्या पट्टा निर्मळ यांच्या गळ्यात टाकून आवळला. तसेच शाहरुख कुरेशी याने यावेळी धारदार शस्त्राने निर्मळ यांच्या पोटात वार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हुकवल्याने त्यांच्या बोटाला दुखापत झाली. तसेच आरोपींनी आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार अशी धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...