spot_img
अहमदनगर"गांजा विक्री करणारी टोळी गजाआड"

“गांजा विक्री करणारी टोळी गजाआड”

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या चौघांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी झेंडीगेट परिसरा मधून गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख एक हजार 350 रूपये किमतीचा सुमारे 10 किलो गांजा, दोन दुचाकी, पाच मोबाईल असा तीन लाख सहा हजार 550 रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार भाऊसाहेब तोडमल (वय 19 रा. सुपा, ता. पारनेर), अनिकेत परसराम हजारे (वय 23 रा. चिंचोडी पाटील ता. नगर), ओमान लियाकत सय्यद (वय 19 रा. हिंगणगाव ता. नगर) व अक्षय उत्तम चौधरी (वय 22 रा. दूधसागर सोसायटी, केडगाव) अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत. काही व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी झेंडीगेट परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरूवारी (15 ऑगस्ट) मिळाली होती.

त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस अंमलदार सुजय हिवाळे, तानाजी पवार, ए. पी. इनामदार, अनुपझाडबुके, दीपक रोहकले, सचिन लोळगे, शिवाजी मोरे, बापुसाहेब गोरे, संगिता बडे यांचे पथक नियुक्त करून कारवाई करण्याच्या सुचना केल्या. पथकाने पंचासमक्ष झेंडीगेट परिसरात सापळा रचून चौघांना पकडले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...