spot_img
अहमदनगरमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची वारी...आधार लिंक करण्यासाठी बँकांच्या दारी...

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची वारी…आधार लिंक करण्यासाठी बँकांच्या दारी…

spot_img

अळकुटीत आणखी एका बँकेची गरज; माजी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांची मागणी

निघोज | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी अळकुटी येथे आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेची गरज असल्याची मागणी माजी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांनी केली आहे.

अळकुटी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे. मात्र परिसरातील वाड्या वस्त्या तसेच गावातील ग्रामस्थ या शाखेचे खातेदार मोठ्या संख्येने आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना गरजू महिलांसाठी सुरु केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तालुयातील साठ हजार महिला या योजनेमध्ये सहभागी झाल्या असून या मधील सहभागी झालेल्या बहुतांश महिलांना शुक्रवार दि. १६ पासून खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.

पोस्ट कार्यालयात आधार कार्ड लिंक करुण केवायसी प्रक्रिया गतीमान असल्याने पोस्टामधील महिला खातेदारांच्या नावावर हे पैसे लवकर जमा झाले आहेत. मात्र अळकुटीमध्ये ठिकाणी सेंट्रल बँकेची एक शाखा आहे. त्या ठिकाणी केवायसी करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एक दिवसात जवळपास हजारो महिला रांगेत उभ्या होत्या. आधार कार्ड लिंक करण्यासाठी महिलांचा पुर्ण दिवस वाया जातो. तसेच दोन चार दिवस हेलपाटे मारावे लागतात. पर्यायाने रोजंदारीवर जाणार्‍या महिलांचा रोज बुडतो म्हणजे आर्थिक नुकसान होते. यासाठी अळकुटी येथे आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे अशी मागणी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...