पुणे । नगर सहयाद्री:-
बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात आज मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आंदोनलस्थळी भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दाखल झाले आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे रमेश बागवे, मोहन जोशी, शिवसेनेचे बाबर, प्रशांत जगताप, रविंद्र धंगेकर, अरविंद शिंदे, संगिता तिवारी, वंदना चव्हाण, आबा बागुल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीतआहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सु्प्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात एवढा क्राईम नव्हता. दुर्दैवाने आता महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. केंद्र सरकारचा हा डेटा सांगतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे.जे अगोदर विद्येचं माहेरघर होतं, ते आता क्राइम कॅपीटल झालंय. दौंडमधील घटनेची फास्टट्रॅक कोर्टात तातडीने सुनावणी झाली पाहिजे,अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.