spot_img
अहमदनगर"शासकीय खर्चाने मेळावे घेणे चुकीच"; आमदार थोरात सरकारवर बरसले

“शासकीय खर्चाने मेळावे घेणे चुकीच”; आमदार थोरात सरकारवर बरसले

spot_img

संगमनेर। नगर सहयाद्री:-
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या केंद्रातील अहंकारी सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली आहे .महिला असुरक्षित आहेत का? सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर धाक राहिला नसून राज्य सरकारचा कारभार भ्रष्टाचारी झाला असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.

खराडी येथे दत्त व वेडूवाई मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, रामदास पाटील वाघ, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे ,वसंतराव साबळे, लहानभाऊ पा.गुंजाळ, रामहरी कातोरे, ॲड नानासाहेब शिंदे,संतोष हासे ,नवनाथ आरगडे, बाळासाहेब शिंदे, पुनमताई माळी, आर.बी राहणे, मंदाताई वाघ, सरपंच सौ ज्योतीताई पवार, उपसरपंच राजेंद्र कोटकर, प्रीतम साबळे ,लक्ष्मण वाघ, आदींसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवीन पाण्याच्या टाकीचे पूजनही आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सततच्या विकास कामामुळे संगमनेर तालुका हा राज्यात सर्वात चांगला तालुका म्हणून ओळखला जातो. सहकार, शिक्षण, राजकारण शेती यामुळे संगमनेरची राज्यात लौकिकास्पद तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. सध्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. सत्ताधार्‍यांचे लक्ष वेगळ्या कामावर असल्याने प्रशासनावर धाक नाही. निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत.
स्वायत्त संस्था दबावाखाली आहेत.

सरकारी पैशाने मेळावे घेतले जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे. हे सर्व आपल्याला बदलायचे आहे.राज्यभरात महाविकास आघाडीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. येणारे सरकार हे आपलेच असून जनसामान्यांच्या विकासाकरता आपण कायम काम केले .कधीही कुणाची अडवणूक केली नाही. याउलट शेजारचे काही लोक येऊन आपल्या तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा लोकांना थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.

तर मा.आमदार डॉ तांबे म्हणाले की, राज्य सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांनी या योजना अगोदर का आणल्या नाहीत .फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना आणल्या आहेत.मागील अडीच वर्षे महागाई वाढवली. हे पैसे जनतेचे पैसे आहेत. सध्या राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज या सरकारने केले आहे . या सरकारला खाली खेचा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दुर्गाताई तांबे,रणजीत सिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, रामदास पाटील वाघ यांची भाषणे झाली.

या कार्यक्रमाला पैलवान गणपत खेमनर, नानासाहेब गुंजाळ, कैलास पानसरे ,अशोक साबळे, भाऊराव वाघ ,आबासाहेब चत्तर ,विलास मोरे, लक्ष्मण साबळे, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच ज्योती पवार यांनी केले प्रास्ताविक वसंतराव साबळे यांनी केले तर लक्ष्मण वाघ यांनी आभार मानले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह मान्यवरांची पारंपारिक वाद्यांमध्ये गावकऱ्यांनी भव्य दिव्य मिरवणूककाढली. या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...