spot_img
लाईफस्टाईलशिखर धवनचा क्रिकेटला रामराम! व्हिडीओ पोस्ट शेअर करत काय म्हणाला पहा...

शिखर धवनचा क्रिकेटला रामराम! व्हिडीओ पोस्ट शेअर करत काय म्हणाला पहा…

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवनने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केले आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती दिली आहे.

शिखर धवनने साधारण 1 मिनिट 17 सेकंदांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आता माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे. मी माझ्या सोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद! जय हिंद!’

व्हिडिओमध्ये काय म्हणाला शिखर धवन?
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, “सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हाजी आणि मदन शर्माजी यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो जिथे मला माझे कुटुंब मिळाले आणि तुम्हा लोकांचे समर्थन आणि प्रेम मिळाले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे.

मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत आहे, तेव्हा मी माझ्या देशासाठी खूप खेळलो याचा मला दिलासा वाटतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचेही आभार मानू इच्छितो.” शिखर धवन २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर वनडे मालिकेत भारतीय संघाकडून तो शेवटचा खेळला होता.

शिखर धवनची कारकीर्द
आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शिखर धवनला २०१० मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. धवनने कसोटी क्रिकेटमध्ये २३१५ धावा केल्या, तर त्याने ७ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकावली. त्याला टीम इंडियासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली.

त्याने वनडेमध्ये धवनने ६७९३ धावा केल्या ज्यात १७ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ अर्धशतकांसह १७५९ धावा केल्या आहेत. शिखर धवन इंडियन प्रिमियर लिगमध्येही पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार होता. एप्रिल २०२४ मध्ये त्याला पंजाब किंग्ज या संघाने ८.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. ज्यात त्याने उत्तम कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...