प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक दरम्यान स्वच्छता मोहीम
अहमदनगर / नगर सह्याद्री –
स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांना दूर ठेवता येते. त्यामुळे नगरकरांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून महापालिका प्रशासन राबवित असलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे व त्या माध्यमातून स्वच्छता अपनाओ ! बिमारी भगाओ !! असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना केले आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये दर शनिवारी व रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. या शनिवारी सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या दरम्यानच्या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी हे आवाहन आयुक्त डांगे यांनी नगरकरांना केले.
या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यात आले. अनावश्यक दगड – माती, कचरा संकलित करण्यात आला. अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स बोर्ड काढण्यात आले.