spot_img
अहमदनगरPolitics News: जामखेडमध्ये बॅनरबाजीचे सोशल वॉर; आ. रोहीत पवार गटाला विरोधकांकडून प्रत्युत्तर

Politics News: जामखेडमध्ये बॅनरबाजीचे सोशल वॉर; आ. रोहीत पवार गटाला विरोधकांकडून प्रत्युत्तर

spot_img

जामखेड। नगर सहयाद्री 
विधानसभा निवडणुक जशी जवळ येऊ लागली तसतसे कर्जत जामखेडमध्ये अनेक इच्छुक आपले महत्त्व पटवून देण्यासाठी पक्षात पाच वर्षांत झालेली घुसमट बाहेर काढून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून जात आहे. राजकीय पक्षाची संख्या वाढत असल्याने अनेकांना सवतासुभा मांडण्याची संधी मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आ. रोहीत पवार यांनी सुरवातीला सुपारी + बाज चिन्ह दाखवून पक्षातून गेलेल्यांची हवा टाईट करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच आ. रोहीत पवार यांच्या बॅनरला धरून विरोधकांनी 12+ माती = ऊ.प.रा. व पुढील अपडेट टाकून जशाचा तसे उत्तर दिले आहे. सोशल मिडीयावर रंगणाऱ्या या बॅनरवॉर मुळे कार्यकर्त्यात मात्र अस्वस्थ झाले आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. तसतसे मतदारसंघात वातावरण गरम व्हायला लागले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात जास्त गळती कर्जतमधून होऊ लागली. पण याचे गांभीर्य आ. रोहीत पवार यांनी घेतले नाही. मात्र पक्ष सोडून जाणारे व महाविकास आघाडीने केलेली मतदारसंघाची मागणी यामुळे आ. रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात 12 आँगस्ट रोजी रात्रीच्या वेळी एक निनावी फ्लेक्स लावला. त्यामुळे त्यांना सोडून जाणारे नेतेमंडळी यांनी आम्ही तुम्हाला 2019 ला निवडून आणले त्यावेळी सुपारीबाज नव्हतो का ? असे बोलून आ. रोहीत पवार यांच्या विरोधात एकच उमेदवार द्यायचा याची मोट बांधण्याचा प्रयत्न चालू केला.

आ. पवार यांनी शक्तीप्रदर्शन करून अनेक जण सोडून गेले तर जनता माझ्याबरोबर आहे हे दाखवून दिले.यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर त्यांचा एक बॅनर झळकतोय यामध्ये सोडून जाणा-यांना उद्देशून नाराज कशामुळे आहे ते लिहले यामध्ये टेंडर दिले नाही, फाजील लाड न पुरवल्यामुळे, स्वताचे टॅंकर न लावल्याने,थेट सामान्य लोकाना भेटलो, थेट लोकांपर्यंत योजना पोहचल्याने, नवरदेवासारखे गाडीत न फिरवल्याने, आधीसारखी मनमानी चालू न दिल्याने, सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी राहील्याने, सगळीकडे भाषण ठोकायला न मिळाल्याने, आता तर कोणाचे नाव न घेताही सुपारीबाज शब्द ऐकून झाले, व शेवटी केले असते या सुपारीबाजांचे लाड तर नेहमीप्रमाणे हेच झाले असते मस्त असा फ्लेक्स मतदारसंघात सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यालाच विरोधकांकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आ. रोहीत पवार यांच्या या बॅनर वॉरला 12+ माती = ऊ.प.रा. कर्जत जामखेडचा एकच नारा प्रत्येक गोष्टीचे बॅनरबाजी करणारा उपरा हवा कशाला स्वाभिमानी भुमीपुत्र व बॅनरवर टेंडर दिले फक्त 12+ मातीला फाजील लाड फक्त, टॅंकर लावले फक्त, थेट भेटला फक्त, नवरदेवाच्या परण्यात ( मिरवणूकीला) कलावरे, बॅन्ड, मांडव, आचारी, देवबाप्पा फक्त, कर्जत-जामखेड मध्ये मनमानी फक्त, सामान्य कार्यकर्ता कर्जत जामखेडचे पाठीशी फक्त, भाषण ठोकायला फक्त, स्वताच्या आँफीसमध्ये पाच पन्नास कामाला फक्त, शे पाचशे पिए फक्त, इव्हेंट मॅनेजमेंट फक्त, डोक्यावर घेऊन जयजयकार करणार कर्जत जामखेडचे मलिदा खाणार फक्त अशा प्रत्येकापुढे 12+ मातीचा उल्लेख केलेला पोस्ट फिरत आहेत. या दोन्ही फ्लेक्समुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात चविष्ट चर्चा होत आहे.

 

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...