spot_img
अहमदनगरकापड बाजारात राडा! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी? नेमकं काय घडलं..

कापड बाजारात राडा! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी? नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
पार्किंगच्या वादातून कापड बाजारातील मोची गल्लीत महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण 5 करून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना गुरुवारी (५ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी नगर र शहरात राहणाऱ्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द ने विनयभंग, मारहाण, अॅट्रोसिटी – आदी कलमानुसार गुन्हा दाखल ग करण्यात आला आहे.शकुर अजिज शेख, अजिज शकुर शेख, अकलाक मन्सुर शेख (सर्व रा. शनी गल्ली, झेंडीगेट, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेत अटक केली आहे.

फिर्यादी यांनी गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोचीगल्ली येथील महावीर दुकानसमोर त्यांची दुचाकी पार्क केली व त्या शेजारी असलेल्या कापड दुकानात गेल्या. फिर्यादी व त्यांच्या आई दुकानात असताना तेथे एक अनोळखी व्यक्ती आला व त्याने पार्किंग केलेली दुचाकी काढून घेण्याचे शकुर शेख याने सांगितले असल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा फिर्यादी पार्किंग केलेली दुचाकी काढण्यासाठी गेल्या असता शकुरने फिर्यादीची दुचाकी रस्त्यावर आडवी लावलेली दिसली. तेव्हा फिर्यादीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ केली. त्याचा मुलगा अजिज तेथे आला व त्याने फिर्यादीची व्हिडीओ शुटींग काढून व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

त्या दोघांनी फिर्यादीला मारहाण केली. अजिज याने लज्जा उत्पन्न होईल असे बर्तन करत जमिनीवर ढकलून दिले. अकलाक शेख याने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...