spot_img
अहमदनगरढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पा आले; पोलीस अधीक्षक ओला यांच्या हस्ते सपत्नीक...

ढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पा आले; पोलीस अधीक्षक ओला यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करून ग्रामदैवत विशाल गणेशाची प्राणप्रतिष्ठा

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

ढोल ताशांच्या निनादात, अबाल वृद्धांच्या जल्लोषात गणपती बाप्पा विराजमान झाले. गणपती बाप्पांबरोबरच वरुणराजानेही हजेरी लावल्याने सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला.

सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या थाटात अन जल्लोषात आगमन झाले. गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी बाप्पाची मूर्ती सजावट साहित्य खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी केली होती. मोठ्या आनंदाने गणरायाची विधीवत पूजा स्थापना करण्यात आली.
अहमदनगर शहराचे ग्रामदेैवत असलेल्या माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते श्री विशाल गणपतीची महापूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रिया ओला यांच्या हस्ते ही महापूजा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेश चतुर्थीनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व सौ. प्रिया ओला यांच्या हस्ते महापूजा करून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर महाआरती होऊन प्रसाद वाटण्यात आला. यावेळी महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरिचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, गजानन ससाणे, माणिक विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदींसह कर्नल डॉ. सोमेश्वर गायकवाड़ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. ओला यांनी ढोल पथकामध्ये सहभाग घेऊन ताशा वादन केले.


श्री विशाल गणेश मंदिरात आमदारांच्या हस्ते महापूजा
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात श्री गणेश चतुर्थीनिमित्त आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली. तर जगताप परिवाराच्या वतीने विशाल गणेश मंदिरास १ लाख रुपये देणगी देण्यात आली. श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्या वतीने आमदार जगताप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पार्वतीबाई जगताप, मंदा जगताप, सुवर्णाताई जगताप, मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, विश्वस्त प्रा. माणिकराव विधाते, ज्ञानेश्वर रासकर, डॉ. विजय भंडारी, मनिष फुलडहाळे आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...