spot_img
अहमदनगरतरुणाची गळफास घेत आत्महत्या

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रायसाहेब काशिनाथ थोत्रे, ( वय ३८ वर्ष,रा ताठेमळा. फुलारी शाळेजवळ, ता जि अहमनगर ) असे मयत तरुणांचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाने ५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास शहरातील ताठेमळा परिसरातील फुलारी शाळेजवळ असलेलया राहत्या घरात लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. ही घटना लक्षात आल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे नेले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास करत पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...