spot_img
महाराष्ट्रकृषीमंत्री मुंडे भल्या पहाटे जरांगे पाटलांना भेटले! बैठकीनंतर मनोज जरांगे काय म्हणाले?...

कृषीमंत्री मुंडे भल्या पहाटे जरांगे पाटलांना भेटले! बैठकीनंतर मनोज जरांगे काय म्हणाले? पहा..

spot_img

Manoj Jarange Patil: कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात आज पहाटे तीन वाजता अंतरवाली सराटी येथे भेट झाली. सरपंचाच्या घरात झालेल्या या भेटीला 20 मिनिटे लागली, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि आरक्षणावर चर्चा झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान आज परळी येथे मनोज जरांगे यांची घोंगडी बैठक होणार असून, त्या अगोदर दोघांमधील भेट महत्त्वाची मानली जाते. काल परळीमधील गणेश उत्सवाचा मध्यरात्री कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीतून अंतरवाली मध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

बैठकीनंतर मनोज जरांगे काय म्हणाले?
मनोज जरांगे म्हणाले की, मी माझ्या मुद्यांवर ठाम असून माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ते फक्त ओबीसीतून कायम ठाम असणार आहे. ज्यावेळी आमची आरक्षण संदर्भात चर्चा झाली तेव्हा व्यासपीठावर धनंजय मुंडे सुद्धा होते. घोंगडी बैठक परळीत होत असून आणि ती ताकदीने होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मी कोणाचाच होऊ शकत नाही. कोणत्या महाविकास आघाडीचा, कोणत्या महायुतीचा मी नाही. मी फक्त मराठ्यांचा असल्याचे जरांगे म्हणाले. आंतरवाली सराटीत कोणीही येऊ शकतं तो आमचा पाहुणा आहे. मला इथं मातृत्वाची भूमिका घ्यावी लागते, असे जरांगे म्हणाले. मी जातीवादी नसल्याचे जरांगे यांनी नमूद केले. मनोज जरांगे यांनी सांगतिले की, कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची चांगलं काम करायला लागली, तर कौतुक का करू नये? आमची आरक्षणावर चर्चा झाली. मला आरक्षणाशिवाय दुसरी वेळ नाही. समोरील व्यक्तीचं वेगळं असतं आणि माझं वेगळंच असतं असे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...