spot_img
अहमदनगरभाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ठेवी अडकल्या; चेअरमन, व्हाईस चेअरमनसह 18 जणांवर गुन्हा

भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ठेवी अडकल्या; चेअरमन, व्हाईस चेअरमनसह 18 जणांवर गुन्हा

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या जेऊर बायजाबाई (ता. नगर) शाखेतील 33 ठेवीदारांच्या तब्बल 94 लाख 14 हजार 296 रूपयांच्या ठेवी अडकल्या असून या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, मॅनेजर, कर्मचारी अशा 18 जणांवर काल, मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संस्थामधील हितसंबधाचे सरंक्षण अधिनियम (एमपीआयडी) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदार रोहिदास सदाशिव जाधव (वय 74 रा. जेऊर बायजाबाई) यांनी फिर्याद दिली आहे.

चेअरमन भारत बबन पुंड, व्हा. चेअरमन आश्‍विनी भारत पुंड, संचालक बबन सहादू पुंड (तिघे रा. बेलपिंपळगाव, ता. नेवासा), वैभव बाळासाहेब विधाते (रा. जेऊर, ता. नगर), शोभाबाई गोरक्षनाथ विधाटे, जालींदर देवराम विधाटे, चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाटे, सचिन दत्तात्रय विधाटे (सर्व रा. पाचेगाव, ता. नेवासा), अक्षय पांडुरंग शेलार (रा. बेलवंडी बु, ता. श्रीगोंदा), रावसाहेब नथु कळमकर (रा. श्रीरामपूर), भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड (रा. माऊलीनगर, सावेडी), मॅनेजर प्रवीण दत्तात्रय राऊत (रा. शेंडी, ता. नगर), शुभम संजय धनवळे (रा. वाघवाडी, जेऊर, ता. नगर), कर्मचारी अनिकेत प्रवीण भाळवणकर, गायत्री राजेंद्र बनकर, पुनम अरविंद मगर, एश्‍वर्या बाळासाहेब गायकवाड, नितीन घुमरे (पुर्ण नाव नाही, सर्व रा. जेऊर बायजाबाई) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वरील संशयित आरोपींनी कट कारसस्थान करून 33 ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करून मल्टीस्टेट सोसायटी मध्ये चालू व बचत खाते उघडुन रोख रक्कमा जमा केली. जास्त व्याजदर देतो, रक्कमा दामदुप्पट देतो असे अमीष दाखवून ठेवीदारांच्या रक्कमाच्या ठेवी ठेऊन घेतल्या. त्यानंतर ठेवीदार यांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता संशयीत आरोपींनी 33 ठेवीदारांचे 94 लाख 14 हजार 296 रूपयांची परतफेड न करता विश्‍वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...