पारनेर तालुक्याच्या पाणी प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांची फसवणूक – संतोष वाडेकर / पारनेर येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेची बैठक
पारनेर / पनगर सह्याद्री :
भूमिपुत्र शेतकरी संघटनेची तालुका बैठक पारनेर येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडली यावेळी शेतकरी कर्जमाफी व तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. या मुद्द्यावर संतोष वाडेकर यांनी मार्गदर्शन केले की शासनाच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी पूर्णता लुटला जात आहे. या पूर्वी दोन वेळा कर्जमाफी झाली पण शासनाच्या अटी-शर्तीमुळे बरेच शेतकरी वंचित राहिले त्यामुळे आता अटी शर्ती न लावता सरसकट कर्जमुक्ती मिळाली पाहिजे.
पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा उभा करावा लागेल. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही आगामी काळात पाण्याच्या मुद्द्यावर धरणे आंदोलन, उपोषण करून प्रभावीपणे काम करण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला.
या वेळी संघटनेत नवीन चेहऱ्यांना संधी देत पुढील प्रमाणे निवडी करण्यात आल्या जिल्हा प्रवक्ते सुभाष पाटील करंजुले, पारनेर तालुकाध्यक्ष मनोज तामखडे, पारनेर शहराध्यक्ष अनिल सोबले, तालुका उपाध्यक्ष रघुनाथ मांडगे, तर सल्लागारपदी शिवाजी तांबे यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष बबन सालके, जिल्हा संघटक संतोष वाबळे, तालुका ऊपाध्यक्ष बाळासाहेब वाळुंज, अविनाश देशमुख, प्रवीण खोडदे, तालुका सचिव अन्सार पटेल, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, युवा नेते अरुण बेलकर, चेअरमन संजय भोर, पांडुरंग पडवळ, विकास साठे, रामदास साठे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.