Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल ते तपोवन रस्त्यावर अनेक ठिकाणी पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी आम्ही स्व खर्चातून दिवे लावले आहेत. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही पथदिवे बसवले जात नाहीत. पथदिव्यांचा प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे.
गेल्या एक वर्षापासून या भागातील नागरिक पथदिवे बसवण्याची मागणी करत आहेत. रात्रीच्या वेळी येथील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते. चेन स्नॅचींगच्या वाढत्या घटना, तसेच घराच्या परिसरात साप, विंचू असे प्राणी आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही ठिकाणी आम्ही स्वखर्चातून दिवे लावले आहेत. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत.
ठेकेदार संस्था, मनपाच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही पथदिवे उपलब्ध झालेले नाहीत. याची दखल घेऊन तत्काळ पथदिवे उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बारस्कर यांनी दिला आहे