spot_img
अहमदनगरधारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

धारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी रॉड व धारदार हत्याराने मारहाण करत हल्ला केल्याची घटना घडली आहे. रणजीत देवराम वैरागर (वय 39 रा. लालटाकी, बारस्कर कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरूनभाजप पदाधिकारी नीलेश सातपुते, राजेंद्र सातपुते, निखील सातपुते, महादेव सातपुते, अर्चना सातपुते, सुनीता सातपुते, गणेश कोतकर व नांगरे (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. केडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी वैरागर हे नगरसेवक विजू पठारे केडगाव लिंक रस्त्यावरील नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर वेल्डींगच्या कामासाठी गेले होते.
9 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान फिर्यादी वेल्डींगचे काम करत असताना संशयित आरोपी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, धारदार हत्यार घेऊन आले. ‘तू इथे कोणाला विचारून काम चालू केले, तुझे नाव काय आहे, असे विचारले असता फिर्यादीने मी नगरसेवक विजू पठारे यांच्याकडे काम चालू केल्याचे सांगितले. त्यानंतर संशयित आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली.

तुम्ही मला शिवीगाळ का करता, जे काही असेल ते मालक पठारे यांना सांगा’, असे फिर्यादीने सांगताच संशयित आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत. दरम्यान, या घटनेत यापूर्वी सातपुते यांच्या फिर्यादीवरून विजय पठारे व इतरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. घटनेनंतर 17 दिवसांनी विरोधी गटाची फिर्याद दाखल झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी

सुपा एमआयडीसी स्थानिकांना रोजगार द्या; पळवे खु. ग्रामस्थांची मागणी तीन दिवसापासून करत आहे धरणे आंदोलन आंदोलन...

नगर-सोलापूर महामार्गवर सोनाराला लुटले; ‘इतका’ ऐवज लंपास

अहमदनगर । सहयाद्री नगर नगर- सोलापूर महामार्गवर सोनाराला धारधार शास्राचा धाक दाखवत १ लाख...

मुलगी शाळेत गेली पण परतलीच नाही? पालकांची पोलीस ठाण्यात धाव, पुढे काय घडलं…

अहमदनगर | नगर सहयाद्री:- शहरात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेते सातत्याने वाढ होत...

पाच हजार युवकांचे ‘शिवनेरी’ किल्ल्यावर ‘श्रमदान’; आ. सत्यजित तांबे म्हणाले, ‘या’ विचारांचे ब्रँड अँबेसिडर व्हा!

संगमनेर। नगर सहयाद्री:- संपूर्ण देशासाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ले यांच्या...