अहमदनगर । सहयाद्री नगर
नगर- सोलापूर महामार्गवर सोनाराला धारधार शास्राचा धाक दाखवत १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबादास रघुनाथ फुंदे ( रा. नारायणडोह, ता. जि. अहमदनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गुरुवार दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास फिर्यादी सराफ व्यावसाईक अंबादास रघुनाथ फुंदे दुचाकीवरून नगर- सोलापूर महामार्गवरून नगरकडे येत होते. दरम्यान तिन अनोळखी इसमांनी त्यांना आडवले.
धारधार शास्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील ३८ हजार रुपये किमतीचे ९.५ ग्रॅम वजनाचे पाच नग सोन्याचे डोरले, १६ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १३ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे दोन नग साखळी लटकण, २४ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाची अंगठी, ४ हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पैंजण, ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.