spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा! कुठे करणार आयोजन? वाचा सविस्तर..

मनोज जरांगे पाटील घेणार दसरा मेळावा! कुठे करणार आयोजन? वाचा सविस्तर..

spot_img

Manoj Jarange Patil: दरवर्षी शिवसेनेचा, आरएसएसचा आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. यावेळी आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारला आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे त्यांनी आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा आयोजित करण्याची माहिती मिळाली आहे.

या मेळाव्याच्या नियोजनासाठी बीडच्या नारायणगड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरणार असून, बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व समाज बांधवांची उपस्थिती राहणार आहे.

मनोज जरांगे पाटलांचा मेळावा नारायणगड येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या...

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...