spot_img
ब्रेकिंगआजचे राशी भविष्य! 'या' राशींच्या जातकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण? वाचा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांच्या मनातील इच्छा होणार पूर्ण? वाचा…

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य
आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा.

मिथुन राशी भविष्य
भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात परंतु, संद्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाइक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो.

सिंह राशी भविष्य
वाहन चालविताना काळजी घ्या. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. नव्या संकल्पना फलप्रद ठरतील. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे.

तुळ राशी भविष्य
आज अचानक तुम्हाला पैश्याची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. कोणीतरी फ्लर्ट करण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश व्हाल.

धनु राशी भविष्य
नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.

कुंभ राशी भविष्य
आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा.

वृषभ राशी भविष्य
आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल.

कर्क राशी भविष्य
ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही.

कन्या राशी भविष्य
मनाला रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. रिकाम्या वेळात तुम्ही कुठली फिल्म पाहू शकतात ही फिल्म तुम्हाला आवडणार नाही आणि तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही आपला महत्वाचा वेळ खराब केला. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य
आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळित असणार नाही. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. कुठल्या पार्क मध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते.

मकर राशी भविष्य
आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात – आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल.

मीन राशी भविष्य
दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...