spot_img
अहमदनगरतपपूतच्या उंबरठ्यावरील भूमिका!; आम्ही झालो तुमच्या मनातला आवाज! नगरकरांनो, कधी द्याल तुमच्या...

तपपूतच्या उंबरठ्यावरील भूमिका!; आम्ही झालो तुमच्या मनातला आवाज! नगरकरांनो, कधी द्याल तुमच्या मुर्दाडपणाला तिलांजली?

spot_img

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के
नगरकरांसाठी चांगले सक्षम असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना ‌‘नगर सह्याद्री‌’ चा जन्म झाला. खरंतर तपपूतच्या उंबरठ्यावर उभे असताना मागे वळून पाहिले पाहिजे. वृत्तपत्र म्हणजे विविध जाहीराती एकत्र करून छापलेले ‌‘जाहीरातींचे उत्तम पॅम्पलेट‌’ अशी आमची ओळख आम्ही होऊ दिली नाही आणि होऊ देणार पण नाही. संपादकीय संस्कार आणि संपादकीय भूमिका नगरकरांना अपेक्षीत आहे आणि त्या अपेक्षेला उतरण्याचा आम्ही प्रयत्न चालविला आहे. बाराव्या वर्षात पदार्पण करताना आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा सविस्तरपणे मांडणार आहोतच!

फक्त लढ म्हणणं वेगळं आणि लढण्यासाठीचं बळ देणं वेगळं! आमच्या पत्रकारीतेच्या वाटचालीत पाठीवर थाप टाकून लढण्याचं बळ देणाऱ्या सहृदयी स्नेही, मित्रजण, मायबाप वाचकांमुळे अकरा वर्षांपूव सुरु केलेला ‌‘नगर सह्याद्री‌’ आज बाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. आतापर्यंतच्या पत्रकारीतेत संघर्षाने माझी कधीच साथ सोडली नाही हे बरेच झाले. हा संघर्ष प्रत्येक टप्प्यावर माझी परीक्षा घेत राहिला. मला सावध, सजग आणि जागृत करत राहिला. कदाचित त्यामुळेच आज आम्ही जे काही आहोत ते असे आहोत असे आम्ही मानतो! अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत एखाद स्वतंत्र विचारांचं वृत्तपत्र चालवणं आणि ते तपपूतच्या उंबरठ्यावर येणं सोप्प नक्कीच नाही. बाराव्या वर्षात पदार्पण हा त्याचाच परिपाक. वृत्तपत्र चालविणे कठीण काम असले तरी हे कठीण काम तुमच्या पाठबळावर आम्ही चालवलेय.

आम्ही सामाजिक भान आम्ही जपलं असून ते यापुढेही जपणार हा आमचा बाराव्या वर्षात पदार्पण करीत असतानाचा शब्द! संघर्षाला सामोरे जाण्याचं, अन्यायाच्या विरोधात लढण्याचं बळ आजपर्यंत तुम्हीच दिलंय आणि यापुढच्या काळातही हे बळ मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळो, इतकीच माफक अपेक्षा! ‌‘नगर सह्याद्री‌’ हे निव्वळ वृत्तपत्र न राहता या माध्यमातून लढवय्या, पराक्रमी आणि कणखर नगरकर उभा करण्याची ही अविरत चालविली जाणारी प्रक्रिया आम्ही राबवली आणि यापुढेही राबवणार! म्हणूनच आम्ही मांडत आलोय निभड नगरकर उभा करण्यासाठीचा ‌‘सारिपाट‌’! वाचक हो, प्रत्येक वळणावर आणि प्रत्येक संघर्षात आपण आमच्यासोबत होता याचा आम्हाला अभिमान आहे. त्यातूनच निभड नगरकर उभा करण्यासाठी आम्ही मांडत आलोत ‌‘सारिपाट‌’!

‌‘कफन सिर पे बांधे निकले है हम‌’ अशा टोकाच्या विद्रोही विचारतली ‌‘नगर सह्याद्री‌’ची टीम नाही, ती तुमच्या आमच्यातलीच आहे आणि म्हणूणच एक बाब अद्यापही खटकते. ‌‘जो हो रहा है, वो सब अच्छा है‌’ असं अगदी मनापासून तुम्ही मान्य केलं असलं तरी आम्ही ते मान्य करायला तयार नाही. चौकाचौकात आणि गावागावात बुजगावण्यांचं नसलेलं मोठेपण मान्य करण्यात धन्यता बाळगणाऱ्यांची किव करावीशी वाटते! आम्ही गेल्या काही वर्षांपासून नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामधील दहशत, गुंडाराजच्या विरोधात खुलेपणाने भूमिका घेतली.

गेल्या अकरा वर्षात ‌‘नगर सह्याद्री‌’च्या माध्यमातून तीच भूमिका आम्ही मांडत आलोय आणि तीच ‌‘नगर सह्याद्री‌’ची ओळख. मात्र, आम्ही हे सारं मांडत असताना आणि खुलेपनाने विरोध करतांना तुम्ही षंडपणा सोडला नाही हे आमचं दु:ख आहे. स्वत:ला दडवून ठेवणं हे संस्कार नगरच्या मातीतले नक्कीच नाहीत! नगरकरांनो, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरी खंबीर व्हा, नव्या नगरच्या निर्मितीसाठी तरी ठामपणे बोलायला शिका, असत्य आणि अन्यायाच्या विरोधात कडवी भुमिका घ्या! एकदा समोर या आणि चांगल्याला चांगले अन्‌‍ वाईटाला वाईट म्हणा! किती दिवस मुर्दाडपणात जगणार?

लाठ्या काठ्या किंवा तलवारी घ्यायला नाही सांगणार आम्ही तुम्हाला, त्यातून होणारी क्रांती ही शाश्वत नसते! आपल्या भावी पिढीचा विचार कधी करणार आहोत की नाही! किती दिवस हे असं मुर्दाडपणाचं लाळघोटेपणाचं वागणं चालू ठेवायचं! ‌‘गलत को गलत कहने की ताकद, हिंमत और जुर्रत रखो…‌’ बस एवढीच अपेक्षा आहे! आमचे नगरचे मातीवर आणि इथल्या माणसांवर प्रेम असले तरी तुमच्या मुर्दाडपणाने आम्ही व्यथित आहोत इतकेच! समाजातील अपप्रवृत्ती संपवायच्या असतील तर आता हातात हात घालून ही लढाई लढावी लागणार आहे आणि त्यासाठीचं बळ, साथ मिळावी इतकेच! तूर्तास अकरा वर्षांच्या वाटचालीत सहकार्य करणाऱ्या सर्वच घटकांचे आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी सहयोगाची अपेक्षा!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...