Manoj Jarange Patil News: विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर एकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगेही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारने आचार संहिते अगोदर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मनोज जरांगे वारंवार करत होते. मात्र मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्याआधीच काल राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ज्यांनी अर्ज केलेत त्यांच्याशी उद्या बोलणार आहे. त्यांच्याशी मला प्रथम चर्चा करायची आहे. 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक होणार आहे, लढायचं की पाडायचं ठरवणार आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी बैठकीला यावे, आपल्या हातात दिवस कमी आहे, सावध राहा , उमेदवार द्यायचे नाही हे ठरवलं जाईल, पण कागदपत्रे तयार राहू द्या. विधानसभा निवडणुकीत काय करायचं समाजाला विचारून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
समाजाला आता शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, ज्यांना शक्य त्यांनी यावं, काम बुडवून येऊ नका. फुकट केस करून फायदा केला, केसेस झाल्या आम्हाला नोकरीत जाता येईना. आमच्या डोक्यात गोळ्या लागल्या हा फायदा आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीकडून लिहून आणा म्हणाले. 15 जाती ओबीस त घेतले हा फायदा आहे का आमचा? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.