पुणे | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे. लवकरच जागावाटपाचा निर्णय हे पक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. काही पक्षांची पहिली यादी तयार असून ते लवकरच जाहीर करतील. अशामध्ये घटक पक्षामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. रासपचे नेते महादेव जानकर 288 जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. महादेव जानकर हे महायुतीमधून बाहेर पडले. त्यांनी उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून उमेदवाराची नावं ते लवकरच जाहीर करतील. दोन दिवसांमध्ये ही यादी जाहीर होईल.
महादेव जानकर बारामतीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या यादीत बारामतीच्या उमेदवाराचे नाव असण्याची शक्यता आहे. रासपची 100 उमेदवारांची पहिली यादी असणार आहे. महादेव जानकर महायुतीमधून बाहेर पडले आहेत. महायुतीच्या विरोधातच महादेव जानकर यांनी दंड थोपटले आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. जानकरांनी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवणार असल्याचे काही दिवसांपूव जाहीर करत महायुतीला इशारा दिला होता.
पहिल्या यादीत सुमारे 25 उमेदवारांना तिकीट मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेली अनेक वर्षे रासपचे काम करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना यादीत संधी मिळणार आहे. बारामतीमध्ये रासपचे जिल्हाध्यक्ष राहीलेल्या संदीप चोपडे यांना रासपचे तिकीट मिळणार आहे. ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आहेत.
महादेव जानकर यांना राज्यपाल नियुक्त यादीत नाव असेल असं आश्वासन महायुतीने दिलं होतं. मात्र नाव नसल्याने जानकर नाराज झाले आणि त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभेला पराभूत झाल्यानंतर महादेव जानकर राज्यपाल नियुक्त कोट्यातून इच्छुक होते. महायुतीने विचारात न घेतल्याने महादेव जानकर नाराज होते. अखेर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.