निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला
पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बरांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होणार आहे हा मेळावा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा असल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याच्या संदर्भात पारनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, राष्ट्रवादी उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, वसंत चेडे आदी पक्ष प्रवेश केलेली पदाधिकारी उपस्थित होते. पारनेर येथे अजित पवारांच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार गट पक्ष चा मेळावा येत्या शनिवारी पारनेर येथे होणार आहे या मेळाव्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती राष्ट्रवादी पक्ष पारनेर येथे शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन..
अजित पवार गटाची राष्ट्रवादी पारनेर मध्ये एकसंघ असून जुन्या नव्यांचा मेळ घालत येत्या १९ ऑक्टोबरला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. अशी माहिती यावेळी सुजित झावरे, काशिनाथ दाते, माधवराव लामखडे,विजय औटी यांनी दिली.