मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र
सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
शनिवारी अजित पवार यांचा पारनेरला मेळावा
पारनेर । नगर सहयाद्री
व्यासपीठावर राष्ट्रावादीची जुनीच मंडळी आहेत. नवीन नाही. या सभेला अनन्यसाधारण महत्व असून तालुक्याच्या विकास कामांच्या बॅकलॉगवर यावेळी चर्चा होणार आहे. अजितदादांना पारनेर तालुका नवीन नाही. तालुक्यातील काळू, भांडगांव, शिवडोह, पिंपळगांव जोगा कालवा अस्तरीकरण हे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले आहेत. आम्ही एकत्र आलो ही एका रात्रीतून गोष्ट घडली नसून आलेले अनुभव, झालेला त्रास, मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दुर ठेवले जाते. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. असे पारनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुजित झावरे यांनी स्पष्ट केले
झावरे पुढे बोलताना म्हणाले १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेस सगळ्यात आदी तत्कालीन आमदार स्व. वसंतराव दादा झावरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या काळामध्ये पारनेर तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य होते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष घरोघर पोहोचविला परंतु आज मूळ राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं जात नाही एका विशिष्ट प्रतिष्ठानच्याच कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो त्यांनाच कामे दिली जातात मूळ ज्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली अशा कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात येत म्हणून आम्ही असा निर्णय घेतला. उद्याच्या काळात आपला हात उजवा रहावा, शासनदारी आपले वजन रहावे, विधानसभेत आपला प्रतिनिधी असावा तसेच अजितदादांसारख्या हक्काच्या माणसामागे उभे राहण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर, माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी नुकताच प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर व अजित दादांच्या होणाऱ्या मेळाव्याच्या अनुषंगाने पारनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
पारनेर विधानसभा मतदारसंघात येत्या शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा होणार आहे हा मेळावा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा असल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या मेळाव्याच्या संदर्भात पारनेर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर, माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, वसंत चेडे आदी पक्ष प्रवेश केलेली पदाधिकारी उपस्थित होते. पारनेर येथे अजित पवारांच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुजित झावरे पाटील व देवकृपा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.